शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कालवा फुटल्याने रस्ता गेला वाहून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:43 PM

तालुक्यातील राजनाला कालवा फुटल्याने रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे कडाव-सापेले रस्ता वाहतुकीस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

संजय गायकवाड कर्जत : तालुक्यातील राजनाला कालवा फुटल्याने रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे कडाव-सापेले रस्ता वाहतुकीस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राजनाला कालवा फुटल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग १ कार्यालयाच्या अखत्यारीत येत असलेला उक्रुळ -चांदई -कडाव -वदप -गौरकामत -दहिवली -कोंदीवडे या रस्त्यावरील तांबस गावापुढे रस्ता वाहून गेल्याने कडाव -सापेले रस्ता वाहतुकीस बंद आहे. तालुक्यातील कडाव -सापेले रस्त्यावरील भाग १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ५० मीटरचा रस्ता वाहून गेला आहे, दोन महिन्यांपासून रस्ता वाहून जाण्याची ही तिसरी घटना आहे. यंदा संततधार पडणाऱ्या पावसामुळे राजनाला कालवा फुटल्याने रस्ता वाहून गेला त्यानंतर हा रस्ता वाहतुकीस बंद होता. तालुक्यातील रस्त्याविषयी आमदार सुरेश लाड यांनी उपोषणाचा इशारा दिला आणि काही रस्त्याविषयी उपोषण सुरू केले. त्या अगोदर सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता दुरुस्त केला. त्यानंतर पुन्हा जोरदार पावसामध्ये रस्त्याचा भाग खचला त्यावर पुन्हा डागडुजी करण्यात आली, मात्र रविवारी पुन्हा हा रस्ता वाहून गेला आहे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग -१ कार्यालयाचे उपविभागीय अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या ठिकाणी राजनाला कालवा फुटला आहे तो दुरुस्त केला पाहिजे, तो दुरुस्त होत नाही तोपर्यंत रस्ता दुरुस्त केला तरी तो वाहून जाणार आहे, असे सांगितले.।नागरिकांची गैरसोयपाटबंधारे विभाग याबाबत उदासीन आहे त्यांच्या कार्यालयाकडून फुटलेल्या कॅनल दुरुस्तीबाबत कोणतीच हालचाल दिसून येत नाही. दोन्ही कार्यालयाच्या तू तू मध्ये ऐन पावसाळ्यात मात्र नागरिकांचे हाल होत आहे. जांभिवली, गौरकामत, वदप, बारणे, तांबस, साळोख, सापेलेमधील नागरिकांची मात्र गैरसोय झाली आहे.मुसळधार पाऊस पडत असल्याने राजनाला कालव्याला पाणी वाढते आणि ते पाणी फुटलेल्या ठिकाणाहून संपूर्ण रस्त्यावरून वाहते अनेक वेळा या परिसरातील मोºया गाळाने बंद झाल्या होत्या त्या साफ करण्यात आल्या. रस्ता वाहून गेलेल्या ठिकाणी खड्डा झाला आहे त्या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दगडी टाकून रस्ता बंद केला आहे व त्या ठिकाणी सावधान असा फलक लावला आहे, रस्त्याविषयी वरिष्ठांना लेखी कळवले आहे.- अजयकुमार सर्वगोड, उपविभागीय अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग