शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत रेल्वे स्थानकात पुलाखालील गॅपचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:51 IST

प्रवासी जखमी होण्याचे प्रकार वाढले : गाडी पकडण्याच्या नादात होत आहेत अपघात

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी पूल उभारला आहे. त्या पादचारी पुलाच्या खालील भाग मागील काही महिन्यांपासून धोकादायक बनला आहे. कारण त्या मोकळ्या जागेत असलेले लोखंडी खांब यांना धडकून अपघात होऊ शकतात. याबाबत मनसेचे कर्जत शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आक्षेप घेतला असून, त्या धोकादायक जागेबाबत योग्य निर्णय घेऊन दुर्घटना घडू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन आणि ईएमयू स्थानकात मुंबई दिशेकडे बांधलेल्या पादचारी पुलाची निर्मिती प्रवाशांच्या सोयीसाठी केली आहे. पादचारी पुलाचे काम सुरू असतानाच कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने पादचारी पुलाची उतरण्याची दिशा लोकल ज्या दिशेला लागते, त्याच दिशेला करण्याची मागणी केली होती. प्रसंगी आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता, परंतु आपल्या चुकीच्या निर्णयावर ठाम असलेल्या रेल्वे प्रशासनाने असोसिएशनच्या मागणीला दाद दिली नाही. पादचारी पुलाची उतरण्याची दिशा लोकलच्या विरुद्ध दिशेलाच केली. परिणामी, रेल्वे प्रवाशांना पादचारी पुलावरून उतरून लोकल पकडण्यासाठी उलटे सुलटे उतरून धावपळ करत लोकल पकडावी लागते.सदर पादचारी पुलाच्या खाली ईएमयू स्थानक व पादचारी पुलाचे लोखंडी खांबमध्ये मोठी मोकळी जागा (गॅप) असल्यामुळे लोकल सुटता सुटता घाईगडबडीत प्रवाशांना पादचारी पुलाखाली फलाट नसल्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक प्रवासी लोकल पकडताना पादचारी पुलाखालील मोकळ्या जागेत (गॅपमध्ये) पडून जखमी झाले आहेत.अशीच एक घटना बदलापूर येथील प्रवासी पादचारी पुलावरून गाडी पकडत असताना घडली व तो प्रवासी लोकल पकडण्याच्या गडबडीत फलाटाच्या खाली पडला. त्यावेळी फलाटावर असलेल्या इतर प्रवाशांनी काहीही हालचाल न करता पडलेल्या अवस्थेत राहण्यासाठी त्याला जोरजोराने आवाज दिला. नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला, परंतु त्याच्या हाता-पायांना आणि संपूर्ण अंगावर खूप जखमा झाल्या. त्यामुळे कर्जत रेल्वे प्रशासनाने पूल आणि फलाटावरील गॅप कमी करावी, त्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.