शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

इरसाळगडावर दरडी कोसळण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:04 IST

इरसाळगड हा खालापूर तालुक्यात येणारा किल्ला आहे. सध्या कोसळलेल्या दरडीमुळे धोकादायक बनला असून गिर्यारोहकांनी जपून वाट धरावी, अशी सूचना चौक ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.

मोहोपाडा : इरसाळगड हा खालापूर तालुक्यात येणारा किल्ला आहे. सध्या कोसळलेल्या दरडीमुळे धोकादायक बनला असून गिर्यारोहकांनी जपून वाट धरावी, अशी सूचना चौक ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जाताना इरसाळगड सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. इरसाळ माचीपासून गडावर जाण्यासाठी एक वाट आहे; पण त्याच मुख्य वाटेवर दरड कोसळल्याने सुळक्यावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.गडावर ट्रेकिंगसाठी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स भेट देतात. समुद्रसपाटीपासून साधारण ३७०० फूट उंच असणारा इरसाळगड हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. माथेरानच्या डोंगररांगेत वसलेला हा गड अनेक ट्रेकर्सला नेहमीच भुरळ घालतो. पावसाळ्यात याचे सौंदर्य अफाट असते. इरसाळ हा एक सुळका आहे. त्यामुळे इतिहासात त्याचा कुठे उल्लेख नाही. गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अस्तित्त्व पाहता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी रायरीपर्यंतचा सारा मुलूख घेतला, तेव्हा हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आल्याचे बोलले जाते. इरसाळ म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. गडावर विशाळा देवीची मूर्ती पाहायला मिळते. गडावर पाण्याचे एक टाक लागते व बाजूलाच एक कपार आहे. हे पाणी पिण्यास योग्य आहे.सुळक्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे. गडमाथ्यावरून समोरच प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो; परंतु काही दिवसांपूर्वी येथील सुळक्याचा मोठा भाग कोसळला आहे. त्यामुळे आता सुळक्यावर जाण्यासाठी असलेली वाटच बंद झाल्याचे ट्रेकर्स सांगतात.