शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अनोखी सेवानिवृत्ती : १९ किलोमीटर धावत जाऊन स्वीकारली निवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 23:15 IST

सातारा : सध्या कोरोनाचे सावट असल्यामुळे जनतेने आपापली काळजी घेण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, याची जनजागृती व्हावी, यासाठी कोरेगाव पोलीस ...

ठळक मुद्देनागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत; जाता-जाता दिला निरोगी आरोग्याचा मंत्र

सातारा : सध्या कोरोनाचे सावट असल्यामुळे जनतेने आपापली काळजी घेण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, याची जनजागृती व्हावी, यासाठी कोरेगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत साबळे यांनी सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी तब्बल १९ किलोमीटर धावत जाऊन सेवानिवृत्ती स्वीकारली. साबळे यांनी अनोख्याप्रकारे कोरोनासंदर्भात जनजागृती केल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

सेवानिवृत्ती म्हटलं की हार-तुरे सत्कार, भाषण असा जंगी कार्यक्रम होत असतो. मात्र, सध्या कोरोनामुळे सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाच्या जागतिक महामारीचा सर्वांनाच फटका बसला आहे. अनेकजण कोरोनामुळे बळी पडत आहेत. त्यामुळे आपण आपल्या शेवटच्या दिवशी कोरोनापासून नागरिकांनी सावध राहावे, हा संदेश घराघरांत पोहोचला जावा, यासाठी वसंत साबळे यांनी साताऱ्याहून कोरेगावला धावत जाऊन निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दि. ३१ रोजी रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील निवृत्तीचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केल्यानंतर अकराच्या सुमारास ते धावत कोरेगाव पोलीस ठाण्यापर्यंत गेले. वाटेत धावताना त्यांचे अनेकांनी स्वागत केले. कोरोनापासून आपला बचाव करा, असा संदेश देत ते तब्बल १९ किलोमीटर अंतर धावले. पोलीस ठाण्याच्या दारात पोहोचल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यासमोर उभे राहून हात जोडले.

गेली तीस वर्षे पोलीस दलात कार्यरत असतानाच अनेक सामाजिक कार्यातही सहभाग घेतला. लोकांना वृक्षारोपणासाठी आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले. आयुष्यात शरीरयष्टी चांगली असेल तर कोणतेही काम शक्य नसते. यासाठी आमच्या पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्यायामाची आवड निर्माण केली. याचे मला आयुष्यभर समाधान राहील.- वसंत साबळे , निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, कोरेगाव

कोरेगाव येथे पोलीस अधिकारी वसंत साबळे यांनी १९ किलोमीटर धावत जाऊन सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर पोलीस ठाण्याला हात जोडले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस