रायगड जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण निश्चित, निधी चाैधरी यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 00:28 IST2020-12-11T00:27:19+5:302020-12-11T00:28:06+5:30
Raigad News : रायगड जिल्ह्यातील सरपंच आणि उपसरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी तसेच महिलांसाठी आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण निश्चित, निधी चाैधरी यांची माहिती
रायगड : जिल्ह्यातील सरपंच आणि उपसरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी तसेच महिलांसाठी आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आली आहे. यासाठी २०११च्या जनगणनेनुसार निश्चित केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या एकूण ८०९ पदातील अनुसूचित जातीसाठी ३३ ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यातील खुल्या प्रवर्गासाठी १६ तर १७ पदे महिलांसाठी राखीव असणार आहेत.
अनुसूचित जमातीसाठी १२४पैकी खुल्या प्रवर्गासाठी ६२ व महिलांसाठी ६२ पदे, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण २१८ पदांपैकी १०९ पदे महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे आरक्षित असणार आहेत, असे चाैधरी यांनी स्पष्ट केले. सर्वसाधारण जागांसाठी एकूण ४३४ पदांपैकी खुल्या प्रवर्गासाठी २१७ तर महिलांसाठी २१७ पदे राखीव असणार आहेत.
तालुकानिहाय सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
अलिबाग- ग्रामपंचायत संख्या - ६२, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-०, अनु.जमाती आरक्षित जागा-खुला ६, महिला ५, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे-खुला ८, महिला ९, सर्वसाधारण जागा-खुला १७, महिला १६.
मुरूड- ग्रामपंचायत संख्या- २४, अनु. जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-०, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला २, महिला ३, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ३, महिला ३, सर्वसाधारण जागा- खुला ६, महिला ६.
पेण- ग्रामपंचायत संख्या- ६४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-०, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ७, महिला ७, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ९, महिला ८, सर्वसाधारण जागा- खुला १६, महिला १६.
पनवेल- ग्रामपंचायत संख्या- ७१, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-२, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ६, महिला ५, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला १०, महिला ९, सर्वसाधारण जागा- खुला १९, महिला १९.
उरण- ग्रामपंचायत संख्या- ३५, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-०, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला १, महिला २, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ५, महिला ४, सर्वसाधारण जागा- खुला ११, महिला ११.
कर्जत- ग्रामपंचायत संख्या- ५४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ८, महिला ६, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ७, महिला ८, सर्वसाधारण जागा- खुला १०, महिला ११.
खालापूर- ग्रामपंचायत संख्या- ४४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ५, महिला ५, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ६, महिला ६, सर्वसाधारण जागा- खुला १०, महिला १०.
रोहा- ग्रामपंचायत संख्या- ६४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-२, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ५, महिला ५, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ८, महिला ९, सर्वसाधारण जागा- खुला १७, महिला १७.
सुधागड- ग्रामपंचायत संख्या- ३४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-०, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ६, महिला ५, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ५, महिला ४, सर्वसाधारण जागा- खुला ६, महिला ७.
माणगाव- ग्रामपंचायत संख्या- ७४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-२, महिला-२, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ४, महिला ३, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला १०, महिला १०, सर्वसाधारण जागा- खुला २१, महिला २२.
तळा- ग्रामपंचायत संख्या- २५, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला २, महिला २, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ३, महिला ४, सर्वसाधारण जागा- खुला ६, महिला ६.
महाड- ग्रामपंचायत संख्या- १३४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-३, महिला-३, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ४, महिला ५, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला १८, महिला १८, सर्वसाधारण जागा- खुला ४२, महिला ४१.
पोलादपूर- ग्रामपंचायत संख्या- ४२, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-२ अनु.जमाती आरक्षित जागा- खुला १, महिला २, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ६, महिला ५, सर्वसाधारण जागा- खुला १३, महिला १२.
श्रीवर्धन- ग्रामपंचायत संख्या- ४३, अनु,जाती आरक्षित जागा- खुला-०, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ३, महिला ३, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ६, महिला ६, सर्वसाधारण जागा- खुला १२, महिला १२.
म्हसळा- ग्रामपंचायत संख्या- ३९, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला २, महिला २, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ५, महिला ६, सर्वसाधारण जागा- खुला ११, महिला ११.
रायगडमध्ये अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षित जागा
खुला-१६, महिला-१७ अनुसूचित जमाती आरक्षित जागा- खुला ६२, महिला ६२, नागरिकांचा मागास
प्रवर्ग आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला १०९,
महिला १०९, सर्वसाधारण
जागा- खुला २१७, महिला
२१७.