शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

"भुजबळांनी सांगितलं असेल जेल कसं असतं, म्हणून नाव येताच दादा भाजपासोबत...- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 14:15 IST

राज ठाकरेंनी भरसभेत उडवली खिल्ली, भाजपावरही साधला निशाणा

Raj Thackeray vs Ajit Pawar: मनसे आणि भाजपा यांच्यात मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा काही महिन्यांपासून रंगल्या होत्या. पण त्या चर्चा आता हळूहळू कमी होताना दिसत आहेत. याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. आज पनवेल ला राज यांचे भाषण झाले. या भाषणात त्यांनी भाजपाच्या आमदार फोडीच्या राजकारणावर टीका केली. तसेच, अजित पवार यांनी भाजपाने घाबरवून सरकारमध्ये सामील करून घेतल्याची अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली. याच वेळी त्यांनी छगन भुजबळांच्या तुरुंगावासाच्या मुद्द्यावरून टोला लगावला.

भुजबळांनी सांगितले असेल जेलमध्ये काय होतं ते...

"तुम्ही सरकारमध्ये का सामील झालात, या प्रश्नावर काही जण सांगतात की त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. ते लोकं खोटं बोलतात. खरं कारण असं असेल की, पंतप्रधानांनी तिकडे भाषणात ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची गोष्ट काढली, तेव्हा लगेच सगळे सत्तेत सहभागी झाले. कारण (छगन) भुजबळांनी सांगितलेलं असणार की जेलच्या आतमध्ये काय काय असते. ते म्हणाले असतील की आपण इथे(सत्तेत) जाऊ पण तिथे (जेलमध्ये) नको, अशा खोचक टोला राज यांनी अजित पवार आणि इतर राष्ट्रवादीच्या आमदारांना लगावला.

खड्ड्यात घालणाऱ्यांना जनता सतत मतदान कशी करते?

"आज मी तुम्हाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आलो आहे. चंद्रयान जे चंद्रावर गेलेय, त्याचा काय उपयोग? तिथे जाऊन खड्डेच पहायचेत, ते महाराष्ट्रात सोडले असते खर्च तरी वाचला असता. हा काही मुंबई गोवा महामार्गाचाच भाग नाहीय. नाशिकच्या रस्त्याचीही तिच अवस्था आहे. हे खड्डे काही आज नाही पडलेत. २००७ साली या रस्त्याचे काम सुरु झाले. काँग्रेसचे सरकार गेले शिवसेना भाजपाचे सरकार आले त्यानंतर कोणा कोणाचे सरकार आले. या खड्ड्यांतून जात असताना त्याच त्याच पक्षातील लोकांना कसे मतदान करता याचे आश्चर्य वाटतेय," असा सवाल राज यांनी मतदारांना विचारला.

दुसऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावून स्वत:च्या पक्षात आणलं जातं...

"अमित ठाकरे जात होता, तिकडे टोल फुटला तेव्हा भाजपाने टीका केली, रस्ते बांधायला पण शिका, उभे करायला शिका. मला असे वाटते भाजपाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिका. लोकांना घाबरवून, त्यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांना स्वत:च्या पक्षात घेतलं जात आहे. या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि त्यामुळेच राजकारणाची पातळी खालावली आहे," असा सणसणीत टोला राज यांनी भाजपाला लगावला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवारChhagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपा