Raigad: खारकोपर -उरण दरम्यान दोन अपघातात दोघांचा मृत्यू: स्टंटबाजी अंगलट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 13:19 IST2024-04-30T13:18:04+5:302024-04-30T13:19:54+5:30
Raigad Railway Accident News: खारकोपर -उरण दरम्यानचा प्रवासी वाहतूकीचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मागील आठवड्यात पहिल्यांदाच झालेल्या दोन वेगवेगळ्या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Raigad: खारकोपर -उरण दरम्यान दोन अपघातात दोघांचा मृत्यू: स्टंटबाजी अंगलट
- मधुकर ठाकूर
उरण - खारकोपर -उरण दरम्यानचा प्रवासी वाहतूकीचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मागील आठवड्यात पहिल्यांदाच झालेल्या दोन वेगवेगळ्या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
उरण-नेरुळ रेल्वे मार्गावरील खारकोपर -उरण दरम्यानचा प्रवासी वाहतूकीचा दुसरा टप्पा जानेवारी पासून सुरू झालेला आहे.या चार महिन्यांत मागील आठवड्यात दोन अपघात घडले आहेत.बुधवारी (२४) रोजी रात्री ९.२० सुमारास गव्हाण गावच्या नजीक रेल्वेच्या पटरीवरील झालेल्या अपघातात राहुल धर्मेंद्र साह (२२) हा मजूर ठार झाला आहे.याप्रकरणी न्हावा -शेवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.
तर रविवारी (२८) रात्री १० वाजताच्या सुमारास धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोकलच्या दरवाजात उभा राहून स्टंटबाजी करीत असताना उरण-कोटनाका येथील रहिवासी भावेश राजेश सोळंकी (२७) हा तरुण प्रवासी लोकलमधून पडून मृत्यू झाला असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.अधिक तपास सुरू आहे.