Raigad: समुद्राला येणार उधाण, भारतीय हवामान शास्त्र विभागाचा इशारा

By राजेश भोस्तेकर | Published: May 5, 2024 11:38 AM2024-05-05T11:38:26+5:302024-05-05T11:38:50+5:30

Raigad News: भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्वीस यांच्याद्वारे समुद्रात उधाण येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवार ५ मे  रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Raigad: Storm coming to sea, Indian Meteorological Department warns | Raigad: समुद्राला येणार उधाण, भारतीय हवामान शास्त्र विभागाचा इशारा

Raigad: समुद्राला येणार उधाण, भारतीय हवामान शास्त्र विभागाचा इशारा

- राजेश भोस्तेकर

अलिबाग - भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्वीस यांच्याद्वारे समुद्रात उधाण येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवार ५ मे  रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने देलेला इशारा लक्षात घेता, समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, येत्या ३६ तासाच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: Raigad: Storm coming to sea, Indian Meteorological Department warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.