Raigad: पोटच्या मुलाने केला आईचा खुन

By निखिल म्हात्रे | Updated: October 25, 2023 23:14 IST2023-10-25T23:13:34+5:302023-10-25T23:14:26+5:30

Raigad Crime News: क्षुल्लक गोष्टीचा मनात राग धरून पोटच्या पोरानेच आईचा जीव घेतला आहे. हि घटना अलिबाग तालुक्यातील सुडकोली गावात मंगळवारी संध्याकालच्या सुमारास घडली.

Raigad: Stomach murders mother | Raigad: पोटच्या मुलाने केला आईचा खुन

Raigad: पोटच्या मुलाने केला आईचा खुन

- निखिल म्हात्रे
 अलिबाग - क्षुल्लक गोष्टीचा मनात राग धरून पोटच्या पोरानेच आईचा जीव घेतला आहे. हि घटना अलिबाग तालुक्यातील सुडकोली गावात मंगळवारी संध्याकालच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपी जयेश खोत याला रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. तर जखमी चांगुणा खोत यांचा अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यु झाला आहे. 

नवखार गावातील जयेश नामदेव खोत (वय-27) याने जेवणावरून त्याच्या आई बरोबर शाब्दीक वाद करण्यास सुरुवात केली होती. काही वेळाने याचे पर्यावसन मारहाणीत झाले. कुठल्याही गोष्टीची परवा न करता आरोपी जयेशने घरातील लाकडी दांडक्याने मारहाण करीत कोयता हातात घेवुन चांगुणा यांच्या डोक्यावर मारला होता. या दरम्याने फिर्यादी नोमदेव खोत आपल्या पत्नीला वाचविण्यासाठी केले असता त्यांना हि जयेशने जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तर जखमी चांगुणाला खेचत बाहेर काढुन तिच्या अंगावर अंगणातील पाळापाचोळा टाकून तिला पेटवून दिले. या आगीत ती भाजल्याने तीला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला.

या प्रकरणी आरोपी जयेश खोत विरोधात भादवी कलम 302, 307,324, 323, 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून जयेश यास अटक करण्यात आली आहे.

Web Title: Raigad: Stomach murders mother