शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

रायगडच्या सेझ जमिनींची सुनावणी तीन महिन्यांत; शेतकऱ्यांनी जमीन परत मागितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 08:12 IST

सुभाष देसाई म्हणाले, शासनाकडून ८ हजार १३४  हेक्टर जमिनीची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यापैकी १,५०४ हेक्टर जमीन शासनाने संपादित केली आहे.

मुंबई: रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण तालुक्यांत महामुंबई सेझसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेली सुनावणी तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी विधानसभेत केली.भाजपचे आशिष शेलार यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. महामुंबई सेझ कंपनीसाठी उरण, पेण, पनवेल तालुक्यांतील १,५०४ हेक्टर जमीन शासनाने संपादित केली होती. प्रत्यक्ष प्रकल्प न झाल्याने सदरची जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, त्याला विलंब होत असल्याचे शेलार म्हणाले. या चर्चेत विधानसभा सदस्य अतुल भातखळकर, महेश बालदी यांनी भाग घेतला.सुभाष देसाई म्हणाले, शासनाकडून ८ हजार १३४  हेक्टर जमिनीची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यापैकी १,५०४ हेक्टर जमीन शासनाने संपादित केली आहे. उर्वरित जमिनींवर शेरेच नाहीत म्हणजेच त्या शेतकऱ्यांच्याच आहेत. १,५०४ हेक्टर जमीन संपादित झाली. ही जमीन शासनाकडून महामुंबई सेझ कंपनीला विकास करण्यासाठी देण्यात आली. मात्र आता जमीन संपादित करून पंधरा वर्षांचा कालावधी उलटला असून त्यावर विकास करण्यासाठी महामुंबई सेझ कंपनीला पाच वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र कंपनीने कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी ही १,५०४ हेक्टर जमीन परत  करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदनावर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. या सुनावणीला तीन महिन्यांची मुदत दिल्याची माहिती देसाई यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.