Raigad Rain: रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पाेलादपूर येथे दरड काेसळून ११ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 15:46 IST2021-07-23T15:46:02+5:302021-07-23T15:46:25+5:30
Raigad Rain: पाेलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी येथे गुरुवारी रात्री दरड काेसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

Raigad Rain: रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पाेलादपूर येथे दरड काेसळून ११ जणांचा मृत्यू
रायगड: पाेलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी येथे गुरुवारी रात्री दरड काेसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 13 जखमींना पाेलादपूर आणि महाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अतिवृष्टीने रायगड जिल्ह्याला चांगलेच झाेडपून काढले आहे. महाड-तळई येथे दरड काेसळून आतापर्यंत 36 जणांचे मृत देह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही माेठ्या संख्येने नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच पाेलादपूर येथील केवनाळे येथे चार घरांवर दरड काेसळली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुतारवाडी येथेही दरड पडल्याने पाच असा एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दाेन्ही गावातील 13 जखमींना महाड आणि पाेलादपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.