Raigad Landslides: तळीयेमधील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता लोकांना मृत घोषित करा, ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:47 PM2021-07-26T12:47:27+5:302021-07-26T12:48:27+5:30

Raigad Landslides: दरडीखाली दबलेले ४९ जणांचे मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं.

Raigad Landslides: Rescue operation stopped in Taliye Village; Declare the missing people dead, villagers demand | Raigad Landslides: तळीयेमधील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता लोकांना मृत घोषित करा, ग्रामस्थांची मागणी

Raigad Landslides: तळीयेमधील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता लोकांना मृत घोषित करा, ग्रामस्थांची मागणी

Next

महाड: गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. २२ जुलैला दुपारी ४ वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली ३५ घरे दबली गेली.

दरडीखाली दबलेले ४९ जणांचे मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन आतापर्यंत ८५ मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही ३६ नागरिक बेपत्ता आहेत. तळीयेमध्ये मृतदेह बाहेर काढताना कोणाचे हात तर कोणाचे पाय अशा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

आजही या पथकांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. मात्र, त्यानंतर दोन तासाने रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी या नागरिकांनी केली.  त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

आतापर्यंत ८५ जणांचे मृतदेह सापडलेले नाहीत. त्यामुळे बचावकार्य सुरूच राहणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले होते. त्यामुळे ग्रामस्थ संभ्रमात होते. सायंकाळी चौधरी बचावकार्य सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या मृतदेहांची अवहेलना पाहवत नाही, ढिगाऱ्याखालून कोणाचे हात तर कोणाचे पाय मिळत आहेत, त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

Web Title: Raigad Landslides: Rescue operation stopped in Taliye Village; Declare the missing people dead, villagers demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.