शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सजला किल्ले रायगड, शिवभक्तांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज

By निखिल म्हात्रे | Published: June 02, 2023 6:32 AM

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगड सजला आहे.

निखिल म्हात्रे  अलिबाग (जि. रायगड) :  ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगड सजला आहे. जिल्हा प्रशासनाने ३३ समित्यांचे गठन केले आहे. काही छोटी-मोठी दुरुस्तीची कामे वगळता कार्यक्रम स्थळाची तयारी पूर्णत्वास आली आहे. या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २४ वैद्यकीय सेंटर्स तैनात केली आहेत. शुक्रवारी सकाळपासून सोहळ्याला सुरूवात होणार आहे.

गडाच्या पायथ्याशी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परिसरात ३ हेलिपॅड तयार ठेवले आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवली आहे. तर गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. रोप-वे मार्ग हा निमंत्रितांसाठी मर्यादित राहणार आहे. त्यामुळे शिवभक्तांनी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजामार्गेच गडावर यावे तसेच हृदयविकार, मधुमेह आणि श्वसन विकार असलेल्या व्यक्तींनी गडावर येणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या संदेशाचे प्रक्षेपणशुक्रवारी सकाळी ८.३० वाजता सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.

गडाच्या पायथ्याशी ४० हजार लिटर पाणीसाठागडावर १०९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. संपूर्ण रायगड किल्ले परिसरात २ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवला आहे.शिवभक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी १ हजार दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था केली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करून ठेवता येणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर १०  हजार लिटर आणि गडाच्या पायथ्याशी ४० हजार लिटर पाणीसाठा करण्यात आला आहे. 

अवजड वाहतुकीस बंदीमुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १६ टनपेक्षा अधिक अवजड वाहनांना महामार्गावर बंदी घातली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी ते पळस्पे, वाकण फाटा ते खोपोली व इतर राज्य मार्गावर वाळू रेती भरलेल्या ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांना बंदी आहे. ३१ मे ते २ जून  रात्री १२ वाजेपर्यंत तसेच ४ जून रोजी  ते ६ जूनपर्यंत ही बंदी असेल. 

टॅग्स :RaigadरायगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज