Raigad: नवखार येथे बेकायदा गुटख्यावर कारवाई  

By निखिल म्हात्रे | Updated: April 18, 2024 09:41 IST2024-04-18T09:38:23+5:302024-04-18T09:41:50+5:30

Raigad News: मांडवा परिसरातील नवखार येथे बेकायदा पानमसाला गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे छापा टाकला असता ८० हजार ९६० रुपये किमतीचा विमल पानमसाला गुटखा व गुन्ह्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली.

Raigad: Action on illegal Gutkha in Navkhar | Raigad: नवखार येथे बेकायदा गुटख्यावर कारवाई  

Raigad: नवखार येथे बेकायदा गुटख्यावर कारवाई  

अलिबाग - मांडवा परिसरातील नवखार येथे बेकायदा पानमसाला गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे छापा टाकला असता ८० हजार ९६० रुपये किमतीचा विमल पानमसाला गुटखा व गुन्ह्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेला नवखार येथे विमल पानमसाला अवैधरीत्या विकला जात असल्याची माहिती मंगळवारी रात्री गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार सपोनी भास्कर जाधव, पोलिस हवालदार अमोल हंबीर, पोलिस हवालदार प्रतीक सावंत, पो. कॉ. ईश्वर लांबाटे यांच्या कारवाई पथकाने घटनास्थळी धाव घेत ही कारवाई केली.

नवखार येथील आरोपी सागर बाळाराम पाटील याच्या ताब्यातून ८० हजार ९६० रुपये किमतीचा विमल पानमसाला गुटखा व ६ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची कार असा एकूण सहा लाख ८० हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त केला. आरोपी सागर बाळाराम पाटील याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या तक्रारीवरून मांडवा सागरी पोलिस भादंवि कलम ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मांडवा सागरी पोलिस ठाणे करीत आहे.

Web Title: Raigad: Action on illegal Gutkha in Navkhar