Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:54 IST2025-05-08T15:54:30+5:302025-05-08T15:54:30+5:30
Raigad Accident News: रायगडमध्ये भरधाव डंपरने एसटी बसला धडक दिली. या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २० जण जखमी झाले आहेत.

Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
रायगडमध्ये भरधाव डंपर आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, २० जण जखमी झाले. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. भरधाव डंपरने एसटी बसला धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये तळा-मांदाड रस्त्यावर भरधाव डंपरने एसटी बसला भीषण धडक दिली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, २० प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.