Rahul Narvekar Video: सोबतच्या माणसाला मारलं, राहुल नार्वेकरांना घेरलं; अलिबागमधील प्रकरण काय?

By राजेश भोस्तेकर | Updated: February 14, 2026 15:35 IST2026-02-14T15:31:47+5:302026-02-14T15:35:09+5:30

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. एका व्यक्तीला मारहाण केल्याचेही यात दिसत आहे. 

Rahul Narvekar Video: Killed a fellow man, surrounded Rahul Narvekar? What is the case in Alibaug? | Rahul Narvekar Video: सोबतच्या माणसाला मारलं, राहुल नार्वेकरांना घेरलं; अलिबागमधील प्रकरण काय?

Rahul Narvekar Video: सोबतच्या माणसाला मारलं, राहुल नार्वेकरांना घेरलं; अलिबागमधील प्रकरण काय?

- राजेश भोस्तेकर, अलिबाग
महापालिका निवडणुकीच्या काळात एका व्हिडीओ अडचणीत आलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा नवीन व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडीओतील घटना अलिबाग तालुक्यात घडली असून, स्थानिक व्यक्तींना विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसोबत असलेल्या एका व्यक्तीला कानशि‍लात मारल्याचेही दिसत आहे. यावरून आता विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. पण, हे प्रकरण काय आहे, तेच समजून घ्या. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात सेजल शहा यांची जागा खरेदी करायची आहे. अडीच एकर जागा खरेदी करण्याचा व्यवहार सुरू होता. 

राहुल नार्वेकरांसोबत वाद कशावरून झाला?

शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) राहुल नार्वेकर हे जागा मोजण्यासाठी तिथे पोहोचले होते. त्यांच्यासोबत जागा मोजणी करणारे कर्मचारीही होते. सेजल शहा यांच्या जागेला लागून रमेश पाटील यांची जागा आहे. मोजणी करताना लगतच्या जागा मालकांना नोटीस देणे बंधनकारक आहे. 

रमेश पाटील यांना जागा मोजणीची कोणतीही नोटीस न देता राहुल नार्वेकर हे मोजणी करीत होते. या कारणावरून रमेश पाटील यांनी नार्वेकर आणि त्यांच्या सोबत आलेल्यांना जाब विचारला. त्यावरून बाचाबाची झाली. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष असून नियमबाह्य काम करीत असल्याचा आरोप केला गेला. 

रमेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील लोक आक्रमक झाले. त्यांनी जाब विचारत राहुल नार्वेकर यांना घेरले. संतापलेल्या पाटील कुटुंबीयांनी एका व्यक्तीच्या कानशि‍लात मारल्या. वाद सुरू झाल्यानंतर नार्वेकर हे लगेच तिथून निघाले. बाहेर जात असताना त्यांनी एका पाटील कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, आक्रमक झालेल्या कुटुंबीयांनी आम्ही घरी नसताना आमच्या जागेत कसे शिरलात असा सवाल केला. त्यानंतर नार्वेकर हे निघून गेले. 

काँग्रेसची राहुल नार्वेकरांवर टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल नार्वेकर यांचा व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. "अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते. स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला", असे म्हटले आहे. 

Web Title : अलीबाग में राहुल नार्वेकर का विरोध, भूमि विवाद में मारपीट।

Web Summary : अलीबाग में भूमि माप विवाद के दौरान स्पीकर राहुल नार्वेकर को विरोध का सामना करना पड़ा। स्थानीय लोगों ने अनुचित प्रक्रिया का आरोप लगाया, जिससे गरमागरम बहस और नार्वेकर के सहयोगी के साथ मारपीट हुई। नार्वेकर टकराव के बाद चले गए; कांग्रेस ने उनकी कार्रवाई की आलोचना की।

Web Title : Rahul Narvekar Confronted in Alibag Land Dispute; Man Assaulted.

Web Summary : Speaker Rahul Narvekar faced opposition in Alibag during a land measurement dispute. Locals allege improper procedure, leading to heated arguments and a physical altercation involving Narvekar's associate. Narvekar left after confrontation; Congress criticizes his actions.