प्रा.डॉ. मऱ्याप्पा सोनवले यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 10:26 IST2023-09-06T10:26:12+5:302023-09-06T10:26:39+5:30

विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान  करण्यात आला.

Prof. Dr. Maryappa Sonwale Awarded Mumbai University's Model Teacher Award | प्रा.डॉ. मऱ्याप्पा सोनवले यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

प्रा.डॉ. मऱ्याप्पा सोनवले यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

उरण : येथील वीर वाजेकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मऱ्याप्पा चुडाप्पा सोनवले यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार  प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ५ सप्टेंबर रोजी सर फिरोजशहा मेहता सभागृह कलिना, मुंबई येथे झाले. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान  करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते. 

डॉ. सोनवले यांना आत्तापर्यंत बरेच पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये पनवेल गौरव पुरस्कार राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, आदर्श प्राध्यापक पुरस्कार यांचा समावेश आहे. डॉ. मऱ्याप्पा सोनवले यांचे संशोधन कार्य,संशोधन पेपर, पेंटेंट व जागतिक स्तरावरील संशोधन कार्य लक्षात घेऊन, त्यांची या पुरस्कारासाठी  निवड केली आहे.

डॉ. सोनवले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कॉलेजचे प्राचार्य, डॉ. पी. जी.पवार, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, सीडीसीचे सर्व सदस्य व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले.

Web Title: Prof. Dr. Maryappa Sonwale Awarded Mumbai University's Model Teacher Award