शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

भाजीपाला-डाळींचे दर उसळले, किचन बजेट पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 12:37 AM

गृहिणींना आर्थिक फटका; डाळी-पालेभाज्या पोहोचल्या शंभरी पार

- निखिल म्हात्रेअलिबाग : अनलॉकनंतर सर्वच व्यवहार आता पूर्वपदावर येत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पालेभाज्या आणि डाळींच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे. त्यामुळे गृहिणींचे ‘किचन बजेट’ कोलमडून पडले आहे.सध्या भाजीपाल्याची आवक कमी मात्र, मागणी जास्त असल्याने त्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. आॅगस्ट, सप्टेंबर आणि आॅक्टोबर हे तीन महिने उपवासाचे असल्याने नागरिकांचा ओढा शाकाहाराकडे अधिक आहे. त्यामुळे पालेभाज्या आणि डाळींना मागणी अधिक आहे. त्यामुळे किमतीत वाढ झाली असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात अनलॉक-५ची सुरुवात झाली आहे. अद्याप वाहतूक सेवा सुरळीत झाली नसल्याने भाजीपाल्याच्या गाड्या दररोज येत नाहीत. त्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी जास्त, अशी अवस्था सध्या बाजारपेठांमध्ये झाली आहे. अचानक वाढलेल्या भाजीपाल्याच्या किमतींमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. साधी कोथिंबिरीची जुडी घेताना महिला विचार करत आहेत. लसूण-मिरचीच्या किमती वाढल्याने, वरणाच्या फोडणीचा चांगलाच ठसका महिला वर्गाला लागत आहे. दुसरीकडे कांदाही सर्वांनाच रडवत आहे.कोरोनाच्या काळात टाळेबंदी झाल्याने अचानक सर्वच गोष्टींचा भाव वाढला. त्यामध्ये भाजीपाल्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तरीही दैनंदिन जीवनाची भाजीपाला ही गरज असल्याने खरेदी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- आनंद पवार, ग्राहककोरोनाच्या कालावधीत शेतकरी शेतामध्ये भाजीपाल्याचे पीक घेण्यास घाबरत होते. लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर बंधने आली होती. त्यातच भाजीपाल्याला अचानक मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत.-हर्ष ढवळे, भाजी विक्रेतेकोरोना कालवधीत धोका पत्करून कुटुंबाचा भार पेलविण्यासाठी शेतीकडे वळलो. शेतात पिकविलेल्या भाजीपाल्यातून उत्पादन मिळाले. मात्र, उत्पादन घेण्यासाठी बी-बियाण्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे.-प्रवीण लोंढे, भाजीपाला उत्पादक शेतकरीभाजीपाला-डाळी महागण्याची कारणेमागील तीन महिने शाकाहाराचे असल्याने, भाजीपाल्यासह डाळींना अधिक मागणी आहे. टाळेबंदी काळात वाहतूक सेवा काही काळ बंद होती. वेळेमध्ये वस्तुंचा पुरवठा होत नसल्याने किमती वाढल्या आहेत.

टॅग्स :vegetableभाज्या