शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

लोकसभेची तयारी, सुनील तटकरेंच्या विरोधात धैर्यशील पाटील?

By जमीर काझी | Published: March 06, 2023 9:33 AM

शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपने पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पद्धतशीर व्यूहरचना आखली आहे

अलिबाग : शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपने पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पद्धतशीर व्यूहरचना आखली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यातील सत्तेत सहभागी असताना २०२४ मध्ये कमळ चिन्हावर जास्तीत जास्त खासदार निवडून  आणण्यासाठी जोमाने काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यात  शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हातात कमळ देण्यात आले आहे.

लोकसभेला रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात उमेदवारी देण्याच्या बोलीवर धैर्यशील पाटील यांनी पक्षप्रवेश केल्याचे सांगितले जाते. शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपने सर्वप्रथम खा. तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांना सेनेतून पक्षात घेतले. पेण विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा लाल बावटा हाती घेतलेल्या धैर्यशील पाटील यांना २०१९ मध्ये पराभवाचा फटका बसला. तेव्हापासून त्यांच्या राजकारणाची दिशा बदलत चालली होती. त्यांची नाराजी लक्षात घेऊन शेकापने पक्षाचे  राज्यस्तरीय अधिवेशन वडखळला भरवून त्यांना मान देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला आहे.

अशी आहे व्यूहरचना

  • मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने लोकसभेला तेच उमेदवार असतील. पेण, अलिबाग, महाड, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर या सहा मतदारसंघांचा रायगड लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. यापैकी  जिल्ह्यातील सेनेचे दोन आमदार शिंदेंच्या सोबत गेले आहेत.
  • श्रीवर्धन मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची तर गुहागर मतदारसंघावर  ठाकरे गटाची पकड आहे.  महाविकास आघाडीच्या फाॅर्म्युल्यानुसार तटकरेंची उमेदवारी निश्चित आहे. माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते ठाकरेंसोबत असले तरी त्यांना थांबावे लागेल अशी चर्चा आहे.
टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेlok sabhaलोकसभा