शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

‘प्रबळगड पॅटर्न’ ठरतोय अर्थार्जनाचे नवे साधन, १४ हजार ५९६ पर्यटकांनी केले सुरक्षित ट्रेकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 04:24 IST

निसर्ग रमणीय आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या रायगड जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात येणारे पर्यटक आणि ट्रेकर्स यांच्या सुरक्षेकरिता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबविलेल्या वैविध्यपूर्ण उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

अलिबाग  - निसर्ग रमणीय आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या रायगड जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात येणारे पर्यटक आणि ट्रेकर्स यांच्या सुरक्षेकरिता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबविलेल्या वैविध्यपूर्ण उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. प्रबळगड येथे त्यांनी राबविलेला सुरक्षित पर्यटनाचा ‘प्रबळगड पॅटर्न’ आता यशस्वी ठरत आहे.पनवेल तालुक्यातील प्रबळगड हे साहसी पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन. या ठिकाणी ट्रेकिंगसाठी येणाऱ्या ट्रेकर्स आणि साहसी युवकांची संख्या खूप मोठी आहे. अनेकदा पर्यटक व ट्रेकर्स जंगलात हरवल्याच्या घटना येथे घडल्या. त्यानंतर प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने पर्यटकांना शोधून त्यांना सुरक्षित स्थळी आणावे लागते. मात्र, हा धोका विचारात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सुरक्षित पर्यटनासाठी एक आगळी योजना तयार केली.प्रबळगड व अन्य अशाच साहसी पर्यटन केंद्रांवर आलेल्या ट्रेकर्सच्या ग्रुपने आपली नोंदणी करावी. तसेच सोबत एक स्थानिक रहिवाशांमधील एक वाटाड्या (गाइड) सोबत न्यावा, ही सेवा प्रति ट्रेकर ५० रु पयांत उपलब्ध करून देण्यात आली. ही जबाबदारी प्रबळगड ज्या वनहद्दीत येतो त्या माची-प्रबळ येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली. या समितीने गावातील माहीतगार युवकांना गाइड म्हणून प्रशिक्षित केले आहे. त्यांना स्थानिक सर्व माहिती होतीच. ही माहिती पर्यटकांना समजावून सांगणे, याबाबत त्यांना प्रशिक्षित करण्यात आले. त्यामुळे स्थानिक युवकांचा कौशल्य विकास होऊन त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगारदेखील उपलब्ध झाला आहे.संयुक्त वन व्यवस्थापन समितीने स्थानिक नागरिकांना किल्ल्याची माहिती पर्यटकांना देणे, आपत्तीच्या प्रसंगी मदत बचाव कार्य राबविणे, प्रथमोपचार करणे यासारखी कौशल्ये शिकवली. शिवाय या समितीमार्फत किल्ल्याच्या मार्गांची डागडुजी, गिर्यारोहणासारख्या उपक्र मांसाठी सोयी सुविधांची निर्मिती, स्वच्छता, जागोजागी दिशादर्शक व माहिती दर्शक फलक लावणे, यासारखी कामे करण्यात आली आहेत.संयुक्त वन व्यवस्थापन समितीला २ लाख ९१ हजार ९२० रुपयांचे उत्पन्नयेथे येणाºया पर्यटकांनी प्रति व्यक्ती ३० रु पये या प्रमाणे गाइड फी व प्रति व्यक्ती २० रु पये या दराने प्रवेश फी आकारण्यात येते. त्यात पर्यटकांना वाहन पार्किंग आदी सुविधा पुरविण्यात येते. नोंदणीस्थळी प्लॅस्टिकच्या वस्तू, वेष्टने आदी जमा करण्यात येतात.पाण्यासाठी जंगलात ठिकठिकाणी वन विभागाच्या वतीने सोयी करण्यात आल्या आहेत. हळूहळू या पद्धतीला पर्यटकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे.जुलै महिन्यातल्या या उपक्रमामुळे एकट्या प्रबळगडावर वर्षभरात १४ हजार ५९६ पर्यटक ट्रेकिंगसाठी येऊन गेले. त्यांनी भरलेल्या गाइड शुल्क आणि प्रवेश शुल्कातून संयुक्त वन व्यवस्थापन समितीला २ लाख ९१ हजार ९२० रु पयांचे उत्पन्न मिळाले.जुलै २०१८ पासून आजतागायत एकही दुर्घटना नाहीकेवळ आर्थिक उत्पन्न हीच या व्यवस्थेची फलनिष्पत्ती नसून त्यामुळे इतरही अनेक फायदे दृष्टिपथास आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे प्रवेशाची नोंद करावयाची असल्याने व तेथे प्लॅस्टिक व अन्य आक्षेपार्ह वस्तूंची तपासणी होत असल्याने गडावर व जंगलात मद्यपान आदी गैरप्रकारांना आपोआप आळा बसला आहे.जंगलात प्लॅस्टिक वस्तू जाण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले, स्थानिक रहिवाशांना रोजगार मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गेल्या जुलैपासून आजतागायत एकही दुर्घटना घडली नाही. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व वन विभागाने संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून केलेल्या या अंमलबजावणीमुळे आता सुरक्षित पर्यटनाचा प्रबळगड पॅटर्न विकसित झाला आहे.प्रबळगड व अशा अन्य ठिकाणी स्थानिक रहिवाशांमधूनच गाइड तयार करण्यात आले. पर्यटकांना गाइड सोबत असल्याशिवाय किल्ल्यावर जाण्यास मनाई केली. तेथे मद्य आदी वस्तू नेण्यास व सेवनास मनाईची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे पर्यटकांना अधिक सुरक्षितता वाटली आणि त्यातून संयुक्त वन व्यवस्थापन समितीलाही उत्पन्न मिळाले, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला.- डॉ. विजय सूर्यवंशी,जिल्हाधिकारी, रायगड

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई