शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

१९८२ साली उभारलेल्या वीज यंत्रणेत अद्याप सुधारणा नाही; जीवावर बेतण्याची स्थानिकांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 12:04 PM

रायगड जिल्हाच्या उत्तरेस, कर्जत तालुक्यातील पाषाणे ते कळंब व पोशीर गावांच्या परिसरात एकूण ४ ग्रुपग्रामपंचायती आहेत . या ४ ग्रुप ग्रामपंचायतीत एकूण ८ ते ९ हजारावर घरं आहेत,  जिथे ४० ते ५० हजारावर लोकवस्ती असलेली गावे आहेत .

मुंबई : रायगड मधील कर्जत तालुक्यात असलेल्या पाषाणे ते कळंब या ४ ग्रुप ग्रामपंचायतिच्या परिसरात सातत्याने विज पुरवठा खंडित होत असून, तक्रार करुनही अद्याप कुठलीही उपाययोजना नाही, म्हणून त्वरित लक्ष घालून उपाययोजना शासनाने करावी अशी मागणी करणारं पत्र युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उत्तम पालांडे यांनी थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विद्युत पुरवठा मंत्री नितीन राऊत यांना दिलं आहे .

रायगड जिल्हाच्या उत्तरेस, कर्जत तालुक्यातील पाषाणे ते कळंब व पोशीर गावांच्या परिसरात एकूण ४ ग्रुपग्रामपंचायती आहेत . या ४ ग्रुप ग्रामपंचायतीत एकूण ८ ते ९ हजारावर घरं आहेत,  जिथे ४० ते ५० हजारावर लोकवस्ती असलेली गावे आहेत . या गावामध्ये गेल्या काही वर्षात विकासकामं जोरदार सुरू असून बरीच गावं शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करतायत. पण विकासकामे होऊनही वर्षानुवर्षे सुरू असलेला विजेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

या ग्रुप ग्रामपंचायतींच्या हद्दीत वीज वारंवार खंडित होणे , जिल्ह्यातील इतर भागापेक्षा अधिक भारनियमन लागू करणे ,पावसाळ्यात विजेचे पोल कोसळून काही दिवसांसाठी वीज पूर्णतः खंडित होणे, विज गेली की पुन्हा कधी येईल याबाबत कुठलाही संदेश मोबाईल वर येत नाही, विजेचे पोल रस्ताच्या बाजूला झुकलेले आहेत . त्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ शकते ,जर योग्य वेळी लक्ष घातले नाही तर, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही .विजेच्या वारंवार खंडित होण्यामुळे आणि भारनियमन लागू केल्यामुळे परिसरातील नागरिक/ग्रामस्थ बेजार झाले आहेत. यावर ठोस उपाययोजना आता सर्व गावातील ग्रामस्थांना अपेक्षित आहेत .

१९८२ सालीची वीज यंत्रणा अद्याप बदलली नाही

या परिसरात १९८२ साली विज येऊन पहिला दिवा पेटला होता . पण तेव्हा गावांमध्ये वीज पोहचवण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेच्या श्रेणीत सुधारणा त्यानंतर अद्याप हवी तशी झालेली नाही . गावांमध्ये लोकसंख्या वाढू लागलीय , विकास कामं होत असल्यामुळे ५-७ मजली इमारती उभ्या राहून गावांच शहरात रूपांतर होतंय . पण विजेची यंत्रणा मात्र आहे त्याच स्थितीत स्थिरावलीय. ती आता श्रेणीसुधारित करण्याची गरज आहे . 

ग्रुपग्रामपंचायत परिसरातील असणारी गावे

पाषाणे,खाड्याचापाडा,आरडे,आसे, माला, खडकवाडी, खरोडावाडी,फराटपाडा,सालोखं, कळंब, मानिवली,पोशीर, चिकणपाडा, देवपाड, परिसर

टॅग्स :mahavitaranमहावितरण