खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन
By Admin | Updated: August 6, 2015 23:33 IST2015-08-06T23:33:46+5:302015-08-06T23:33:46+5:30
शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नागरिकांना चालणे व गाडी चालवणे कठीण झाले असून खड्डे

खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन
म्हसळा : शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नागरिकांना चालणे व गाडी चालवणे कठीण झाले असून खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. दिघी पोर्टने रस्त्यावरील खड्डे एक महिन्याच्या आत न बुजवल्यास म्हसळा तालुका आरपीआय पक्षाकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा म्हसळा तहसीलदार यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल ते म्हसळा चेक पोस्टपर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड (पर्यायाने दिघी पोर्ट) कडे वर्ग करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने दिघी पोर्टशी केलेल्या करारानुसार दिघी पोर्टने त्यांच्याकडील माल वाहतुकीसाठी ज्या रस्त्याच्या वापर करावयाचा आहे. त्या रस्त्यांची सुधारणा करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही दिघी पोर्टची आहे. मात्र दिघी पोर्ट या रस्त्याकडअ दुर्लक्ष करीत आहे. दिघी पोर्टने या रस्त्यांची दुरु स्ती एका महिन्यात केली नाही तर दिघी पोर्टची एकही गाडी म्हसळा शहरातील हद्दीतून जावू दिली जाणार नाही, वेळ पडल्यास म्हसळा तालुका आरपीआयकडून आंदोलन छेडण्यात येईल, असे लेखी निवेदन म्हसळा तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी म्हसळा तालुका आरपीआय अध्यक्ष राजेश तांबे आदी उपस्थित होते.