रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 06:16 IST2025-06-03T06:15:22+5:302025-06-03T06:16:24+5:30

अजित पवार गट सोबत नको आ. महेंद्र दळवी

Politics over 'napkin' intensifies in Raigad; Bharat Gogavale again challenges Sunil Tatkare | रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खा. सुनील तटकरे यांनी एका कार्यक्रमात राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या 'नॅपकिन' हाताळण्याची नक्कल केली होती. यावरून त्यांच्यात वाद रंगला होता. त्यानंतर महाड येथे रविवारी झालेल्या गोगावलेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना नॅपकिन वाटण्यात आले. तर, गोगावले यांच्यासह उपस्थितांनी नॅपकिन फिरवून हा विषय संपला नसल्याचे संकेत दिले. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावले आणि खा. तटकरे यांची कन्या, राज्याच्या मंत्री अदिती तटकरे इच्छुक आहेत. त्यामुळे ते एकमेकांना वारंवार लक्ष्य करीत असल्याचे आढळते.

महाडला १८ मे रोजी झालेल्या कार्यक्रमात अजित पवार गटाच्या कार्यक्रमात खा. तटकरे यांनी गोगावले यांच्या नॅपकिन हाताळण्याची नक्कल केली होती. याला गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले होते. आता महाड येथे रविवारी वाढदिवसानिमित्त भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना नॅपकिन वाटप करत हा विषय अजून संपलेला नसल्याचे संकेत दिले.

अजित पवार गट सोबत नको आ. महेंद्र दळवी

शिंदेसेनेचे आ. महेंद्र दळवी यांनी वाढदिवस कार्यक्रमात खा. तटकरे यांच्यावर टीका केली. एवढेच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती नाही तर युती होईल, असे सांगितले. शिंदेसेना आणि भाजप युती होईल पण, अजित पवार गट कुठेच नसेल, असा दावाही त्यांनी केला. तर, आ. महेंद्र थोरवे यांनी शायरीतून हल्लाबोल केला. 'सिंचन घोटाळा' फाईल अजून बंद झाली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Politics over 'napkin' intensifies in Raigad; Bharat Gogavale again challenges Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.