जनतेचे रक्षण करणारे पोलिसच निघाले दरोडेखोर; दोघांच्या आवळल्या मुसक्या, एकजण फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 17:49 IST2025-02-09T17:49:00+5:302025-02-09T17:49:28+5:30

कमी पैशात सोनं देतो, अशी बतावणी करत १ कोटी ५० लाख लुटले.

police, who were protecting the public, caught by police for robbing | जनतेचे रक्षण करणारे पोलिसच निघाले दरोडेखोर; दोघांच्या आवळल्या मुसक्या, एकजण फरार

जनतेचे रक्षण करणारे पोलिसच निघाले दरोडेखोर; दोघांच्या आवळल्या मुसक्या, एकजण फरार

अलिबाग- कमी पैशात सोनं देतो, अशी बतावणी करीत १ कोटी ५० लाखाची लुटमार करणाऱ्या दोन पोलिसांसह आणखी दोघांना स्थानिक गुन्हे विभागाने अटक केली आहे. तर एक पोलिस हवालदार अजूनही फरार आहे, त्याचा शोध स्थानिक गुन्हे विभाग घेत आहे.

समाधान पिंजारी, शिवकुमार उर्फ दिप गायकवाड, पोलिस अंमलदार समिर म्हात्रे, विकी साबळे यांना स्थानिक गुन्हे विभागाने अटक केली आहे. या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता समाधान पिंजारी, शिवकुमार उर्फ दिप गायकवाड यांना १४ फेब्रुवारी २०२५, तर पोलिस अंमलदार समिर व विकी साबळे याला १२ फेबुवारी पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. तर पोलिस हवालदार हनुमंत सुर्यवंशी अजूनही फरार असून त्याच शोध पोलिस घेत आहेत.

आरोपी समाधान गणपत पिंजारी याने १५ दिवसापूर्वी नामदेव हुलगे (रा.नागपुर व्यवसाय-ज्वेलर्स) यांना संपर्क साधून शंकर कुळे याच्याजवळ ७ किलो सोने आहे व तो पोच कोटी रुपयाला देत आहे असे अमिष दाखविले होते. या खोट्या अमिषाला बळी पडीत दिड कोटी रुपयांची रोकड घेत नामदेव हुगले आपल्या नातलगासोबत सोनं खरेदी करण्यासाठी अलिबागला पोहोचणार होता.

मंगळवारी सायंकाळी ४.३० सुमासार आरोपी समाधान पिंजारी ने बोलाविलेल्या इनोव्हा गाडी गाडीतून येत असताना तिनवीरा डॅमवर गाडी थांबिवली. त्यावेळी आरोपी समाधानने पुढे पोलीस चेकींग चालू आहे, मी शंकर कुळे यास सोने घेवून याच ठिकाणी बोलावितो असे सांगितले. त्यावेळी इनोव्हा चालक अटक आरोपी दीप गायकवाड यांने इनोव्हा गाडी यु टर्न करून पनवेलच्या दिशेने तोंड करून उभी केली.

थोडयाच वेळात अटक केलेले पोलीस अंमलदार समीर परशुराम म्हात्रे व विकी सुभाष साबळे हे गणवेशात मोटारसायकल वरून त्याठिकाणी आले. त्यावेळी गाडीत बसलेला आरोपी समाधान पिंजारी यांने नामदेव हुगले व त्याच्या सहकारीला पोलीस आले आहेत. गाडीच्या खाली उतरायला सांगितले. नामदेव आपल्या पैशांच्या बॅगा गाडीत ठेऊनच खाली उतरले.

आरोपी अंमलदार पोलिस उभ्या असलेल्या इनोव्हा जवळ जावुन इथे काय करत आहात. इथे मर्डर होतात व फिर्यादी व त्यांचे सहकारी यांचे अंगझडती घेवू लागले. वर त्यांना खिश्यामध्ये गांजा आहे काय, गाडीमध्ये कोण आहे, गाडी चेक करावी लागेल असे बोलून गाडीजवळ गेले. त्यावेळी आरोपी दीप गायकवाड गाडी चालू करून सुसाट वेगाने पनवेलच्या दिशेने पैशासह गाडी निघून गेला. त्यानंतर तेथे आलेल्या पोलीस अंमलदारानी गाडीचा पाठलाग करून पकडतो व त्यांना घेवून येतो असे सांगुन निघून गेले.

दोन दिवसानंतर आपल्याला फसविले असल्याचे लक्षात येताच फिर्यादी नामदेव हुलगे यांनी थेट जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर हा तपास स्थानिक गुन्हे विभागाकडे देण्यात आला होता. स्थानिक गुन्हे विभागाने पथक तयार करून या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

Web Title: police, who were protecting the public, caught by police for robbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.