शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

मुरुड समुद्रकिनाऱ्याची बंधा-याअभावी दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 1:59 AM

कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

- संजय करडे मुरुड : कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पावसाळ्यात येणारी भरती यामुळे धूपप्रतिबंधक बंधारे फुटून भरतीचे पाणी शेतीमध्ये जात आहेत, तसेच समुद्रकिनाºयाला असणारी दगडाच्या भिंतवरून पाणी गेल्याने समुद्रकिनारच्या सुरूंच्या झाडांची वने नष्ट होऊन समुद्रकिनाºयाचे मोठे नुकसान होत आहे.किनाºयाची धूप, लाटांच्या माºयामुळे दिवसेंदिवस उन्मळून पडणारी उंच सुरूची झाडे, उधाणासोबत वाहून आलेला कचरा, बसण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या बाकांची दुर्दशा. अशी स्थिती आहे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरुडच्या समुद्रकिनाºयाची. या पर्यटनवृद्धी होणाºया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे गांभीर्याने कोणीही लक्ष न दिल्यास भविष्यात हा किनारा उद्ध्वस्त होऊन पर्यटनस्थळाचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.मुरुडमध्ये दरवर्षी दीड लाखापेक्षा अधिक पर्यटक येतात. ही संख्या नजीकच्या वर्षात दुप्पट हाण्याची शक्यता आहे. तथापि रस्ते व किनारा सुशोभीकरण, वाहनतळ आदी मूलभूत सुविधा देण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. मुरुड नगरपरिषदेनेही प्राधान्याने हा विषय लावून धरला असला, तरी शासनाकडून अपेक्षित विकास निधी आणू शकले नाहीत, ही सत्यता नाकारता येत नाही.मुरुड समुद्रकिनाºयावरील जिल्हा परिषद विश्रामगृह ते विश्रामबागेपर्यंतचा दगडी बांध नावापुरताच उरला असून पावसाळी लाटांच्या माºयात सुरूची अनेक झाडे उन्मळून पडली असून ही झाडे संवर्धनासाठी गेल्या १० ते १५ वर्षांपासून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. सामाजिक वनीकरणाच्या १९८० सालच्या योजनेतून सुरूंच्या झाडांची लागवड केली होती. आज घडीला पर्यटकांसाठी सुरूचे बन हे आकर्षण ठरू पाहत असले तरी योग्य पद्धतीने वृक्षांचे संवर्धन झालेले नाही. मेरीटाइम बोर्डानेही धूपप्रतिबंधक बंधाºयाकडे फारसे लक्ष न दिल्याने मुरुडच्या किनाºयाची बिकटावस्था आहे. मुरुडच्या किनाºयावर धूपप्रतिबंधक दगडी बंधारा बांधून उर्वरित सुरूंच्या झाडांचे संवर्धन करणे अंत्यत गरजेचे आहे. तरी शासनाने या पर्यटनस्थळी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.>अलिबाग समुद्रकिनाºयाप्रमाणे दगडी बंधारा बांधण्याची मागणीमुरुड समुद्रकिनारी वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते, अशा वेळी मुरुड शहरातील समुद्रकिनारा हा सुंदर असणे गरजेचे आहे; परंतु यंदाच्या या पावसात मोठी भरती आल्याने समुद्रकिनारी असणारा बंधारा उद्ध्वस्त झाला आहे, तर जिल्हा परिषद गेस्टहाउस मागील दगडी बंधाºयावरून पाणी गेल्याने असंख्य सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे किनारा उघडा-बोडका दिसत असून या ठिकाणी लवकरात लवकर दगडी बंधारा बांधणे खूप आवश्यक झाले आहे. पर्यटक व स्थानिक नागरिकांनी या भागात अलिबाग समुद्रकिनाºयाप्रमाणे दगडी बंधारा बांधावा, अशी मागणी केली आहे.>मेरीटाइम बोर्डाकडे आम्ही पाठपुरावा करीत असून किनारा सुशोभीकरणाचा २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव १६ एप्रिल २०१८ रोजी सादर केला आहे. पर्यटन मंत्रालयातही दोनदा भेट देऊन या विषयासाठी संपर्क केला आहे. तसेच पालकमंत्र्यांनी ही शिफारस केली आहे. निधी प्राप्त होताच किनारा सुशोभीकरण करणार असून पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळावा, असा मुरुड नगरपरिषदेचा प्रयत्न आहे.- पांडुरंग आरेकर, नियोजन व पर्यटन समिती सभापती, नगरपरिषद मुरुड