शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

हरित बंदर विकसित करण्याची योजना, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 2:17 AM

विविध योजनांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जेएनपीटीने बंदर क्षेत्रात हरित बंदर विकसित करण्याची योजना आखली आहे.

- मधुकर ठाकूरउरण : देशातील अत्याधुनिक बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन न्यासाने नुकतेच ३१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. विकास आणि प्रगतीच्या जोरावर वर्षाकाठी सुमारे ९५७ कोटी रुपयांचा नफा मिळवून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणा-या जेएनपीटीने हरित बंदर विकसित करण्यासाठी विविध योजना अमलात आणण्याची तयारी सुरू केली आहे.जेएनपीटी बंदरातील अत्याधुनिक पायाभूत सोयी-सुविधांमुळे कंटेनर हाताळणीच्या आयात-निर्यात क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विकसित कस्टम हाउस, ४० पेक्षा अधिक कंटेनर स्टेशन, देशभरातील सर्वच प्रमुख शहर व बाजारपेठेपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी असलेली रेल्वे सुविधा, रस्ते आणि इतर आवश्यक सुविधांमुळे व्यापारात दिवसागणिक प्रचंड प्रमाणात वाढ होत चालली आहे.देशातील मुख्य बंदरांपैकी ५२ टक्के व्यापार एकट्या जेएनपीटी बंदरातून होत आहे. या प्रगतीच्या जोरावर जेएनपीटी बंदर जागतिक क्रमवारीत २८ व्या स्थानावर पोहोचले आहे. बंदराच्या विकासासाठी विविध योजना अमलात आणल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने समुद्री चॅनेलची रुंदी व खोली वाढविणे, रस्ते रुंदीकरण करणे, कंटेनर टर्मिनलचा विस्तार आदी योजनांचा समावेश आहे. त्याशिवाय २७७ हेक्टर क्षेत्रात आर्थिक विशेष क्षेत्र आणि चौथ्या कंटेनर टर्मिनलचा पहिला टप्पा २०१८ ला पूर्ण झाला असून, दुस-या टप्प्यासाठी सुरुवात होणार आहे. या विविध योजनांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जेएनपीटीने बंदर क्षेत्रात हरित बंदर विकसित करण्याची योजना आखली आहे.जेएनपीटी बंदर सुमारे ३,४०२ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. यापैकी सुमारे १,२०० हेक्टर क्षेत्र कांदळवन व हरित पट्ट्याखाली आहे. १६० हेक्टर क्षेत्र इको पार्कसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. इको पार्कमधील झाडांची लागवड, संवर्धन, निगा करण्याचे काम वनविभागाकडे सोपविण्यात येणार आहे. जेएनपीटीने याआधीच झाडांची लागवड करून बंदर परिसरात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बंदर स्वच्छ आणि हरित करण्यासाठी शाश्वत पर्यावरण व्यवस्थापनाबाबत जेएनपीटीच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने बंदर आवारात वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक कार्ट खरेदी केली आहे. बंदर आपले कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयास करीत असल्याचे जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.ट्रॅक्टर-ट्रेलरचे आंतर-टर्मिनल हस्तांतर, बंदर इमारतींवर नूतनीकरण, योग्य सौरऊर्जा प्रणाली, छोट्या प्रमाणातील तेलाच्या गळतीचा सामना करण्यासाठी मल्टीपर्पज युटिलिटी लॉन्च, नवीन सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, ई-आरटीजीसीज, बंदर परिसरात एलईडी दिवे लावणे, ई-कार्ट, आयआयटी मद्रासमार्फत पर्यावरण देखरेख ठेवणे, असे अनेक प्रकल्प हरित बंदर योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आले आहेत, यामुळे देशातील एकमेव हरित बंदर म्हणूनही जेएनपीटी बंदराची गणना होऊ लागली आहे. यासाठी जेएनपीटीला इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.विकासाच्या नावाखाली मुंबई, ठाणे, रायगड आदी जिल्ह्यात कांदळवन, जंगल आणि झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबरच पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे. पशूपक्षी आणि वन्यजीवांना उपयुक्त व उपलब्ध असलेले नैसर्गिक आवासही नष्ट होत चालले आहेत. त्यामुळे दुर्मीळ पशूपक्षीही नजरेस पडेनासे झाले आहेत. याविरोधात सामाजिक, पर्यावरण, निसर्गप्रेमी, प्राणिमित्र संस्था सातत्याने आवाज उठवत आहेत. प्रसंगी न्यायालयातही दाद मागितली जात आहे.हरित बंदरामुळे पक्ष्यांसाठी नैसर्गिक आवासांची संख्या वाढण्यासाठी मदतगार सिद्ध होईल, त्यामुळे या ठिकाणी येणाºया दुर्मीळ स्थलांतरित पक्ष्यांमध्ये वाढ होईल, असा विश्वास निसर्गमित्र,पक्षिप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली जेएनपीटीकडून लागवड केलेली राखीव कांदळवन, जंगल आणि झाडांची कत्तल होणार याची दक्षता घेतल्याची आवश्यकता असल्याची अपेक्षाही निसर्गमित्र, पक्षिप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.पर्यावरणाच्या समतोलासाठी जेएनपीटी कटिबद्ध आहे, देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावत असताना जेएनपीटीला हरित बंदर म्हणून विकसित करण्याची योजना आहे.- संजय सेठी,अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू पत्तन न्यास

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई