शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

अलिबाग-वडखळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्राची परवानगी, दिलीप जाेग यांच्या आंदाेलनाला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 12:28 AM

Alibag-Wadkhal road News : पीएनपी जंक्शन, धरमतर पूल ते जेएसडब्ल्यू धरमतर गेट ते रेल्वे अंडरपास ते धरमतर पोलीस चौकी ते वडखळ नाका सकर्लसह रस्त्याचे काँक्रिटीकरण पीएनपी आणि जेएसडब्ल्यू या खासगी कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून करावे, अशी मागणी खड्डे ॲक्टिव्हिस्ट दिलीप जोग यांनी या कंपन्यांकडे केली हाेती.

 रायगड : वडखळ-अलिबाग रस्त्याची झालेली दुरवस्था आता काही लपून राहिलेली नाही. या मार्गावरून प्रवास करणे आता चांगलेच जिकिरीचे झाले आहे; मात्र प्रशासन, सरकार आणि लाेकप्रतिनिधी यांना त्याबाबत काहीच पडलेले नसल्याचे दिसून येते. येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाेग यांनी २६ जानेवारी राेजी आंदाेलन केले हाेते. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने हा रस्ता जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यास मंजुरी दिली आहे.वडखळ-अलिबाग हा रस्ता सुसाट होणार, २१ मिनिटात अलिबागवरून वडखळला पोहोचता येणार, अशी विविध स्वप्ने येथील राजकारण्यांनी जनतेला दाखविली; पण तो रस्ता वाहतुकीसाठी निटनेटका करणेही कोणाला जमले नाही. परंतु अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांच्या आंदाेलनाला यश आले आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून रस्ता करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे लेखी पत्रच नॅशनल हायवे ॲथोरिटीने दिलीप जोग यांना पाठविले आहे. जोग यांनी या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी २६ जानेवारीला जेएसडब्ल्यू कंपनीसमोरील चेकपोस्टवर जनआंदोलन केले होते.पीएनपी जंक्शन, धरमतर पूल ते जेएसडब्ल्यू धरमतर गेट ते रेल्वे अंडरपास ते धरमतर पोलीस चौकी ते वडखळ नाका सकर्लसह रस्त्याचे काँक्रिटीकरण पीएनपी आणि जेएसडब्ल्यू या खासगी कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून करावे, अशी मागणी खड्डे ॲक्टिव्हिस्ट दिलीप जोग यांनी या कंपन्यांकडे केली हाेती. तसेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी, रायगड, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडेही मागणी केली होती. जोग यांनी त्यांच्या निवेदनामध्ये वडखळ-अलिबाग या चारपदरी रस्त्याचे काम रद्द झाले आहे. या रस्त्यावर सर्वात जास्त वाहतूक पीएनपी, धरमतर पोर्ट इन्फ्रा आणि जेएसडब्ल्यू कंपनींच्या ओव्हरलोड ट्क, ट्रेलरची सुरू असते. त्यामुळे या कंपन्यांनीच त्यांच्या सीएसआर फंडातून निधी खर्च करून उत्त्तम दर्जाचे काँक्रिटचे रस्ते ठेकेदारांना न देता स्वतः करावेत, अशी मागणी केली होती. कंपन्यांनी त्यांच्या आसपासचे हे वर्दळीचे  रस्ते कंपनीला तसेच लोकांनाही फायदयाचे असणारे केले तर, जनता  आभारी राहील, असे दिलीप जोग यांनी सांगितले होते.प्रकल्प संचालकांचे पत्रजोग यांच्या प्रयत्नांना यश येऊन नॅशनल हायवेचे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे यांनी त्यांना लेखी पत्र दे‌ऊन या रस्त्याची दुरूस्ती नॅशनल हायवेच्या नियमांनुसार जेएसडब्ल्यू यांना त्यांच्या सीएसआर फंडातून करण्यास विशेष बाब म्हणून परवानगी दिली असल्याचे कळवले आहे. लवकरच आता प्रवशांची खड्ड्येमय प्रवासातून सुटका हाेणार आहे. परंतु रस्ते तरार करताना संबंधितांनी रस्त्याचा दर्जा राखावा आणि ते रस्ते जास्त कालावधीपर्यंत टिकतील, असेच निर्माण करावेत, अशी माफक अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगडroad transportरस्ते वाहतूक