शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

कुपोषण निर्मूलनासाठी बालरोगतज्ज्ञ सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 3:03 AM

कर्जत : कुपोषणाने बालिकेचा बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली होती. मात्र, कुपोषण निर्मूलनासाठी त्या घटनेनंतर दोन महिन्यांनीदेखील बाल उपचार केंद्रे सुरू झाली नाहीत.

विजय मांडे कर्जत : कुपोषणाने बालिकेचा बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली होती. मात्र, कुपोषण निर्मूलनासाठी त्या घटनेनंतर दोन महिन्यांनीदेखील बाल उपचार केंद्रे सुरू झाली नाहीत. सामाजिक बांधिलकी ओतप्रोत भरलेल्या डॉ. उपेंद्र सुगवेकर यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील अतितीव्र अशा १९ कुपोषित बालकांवर उपचार सुरू केले आहेत. यासाठी बालरोग तज्ज्ञ डॉ. सुगवेकर कुपोषित बालकांना आवश्यक औषधे देखील स्वत: उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील कुपोषणाबाबत उदासीनता असताना नेरळमधील कुपोषण कमी करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत, तर तीव्र कुपोषित ४२ बालकांवर अन्य ठिकाणी खासगी डॉक्टरांची मदत घेतली जात आहे.दरवर्षी पावसाळ्यानंतर कुपोषण वाढते असे दिसून आले असून, या वर्षी अतितीव्र म्हणजे सॅम श्रेणीमध्ये असलेल्या बालकांची संख्या वाढली आहे. ५३ बालके कर्जत तालुक्यात सॅम श्रेणीत असताना त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यासाठी ग्रामीण रु ग्णालय स्तरावर बाल उपचार केंद्र आणि गाव पातळीवर ग्रामबाल उपचार केंद्र सुरू करण्याचे निर्देश आॅक्टोबर महिन्यात देण्यात आले आहेत. असे असताना कुपोषित बालकांवर उपचार करणारी यंत्रणा कुठेही कार्यान्वित होत नसल्याने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी सामाजिक बांधिलकी पुढे आली आहे. नेरळ येथील बाल रोगतज्ज्ञ डॉ. उपेंद्र सुगवेकर यांनी आपल्या दररोजच्या प्रॅक्टिसमध्ये स्वत: वेळ देतकुपोषित बालकांची जबाबदारी घेतली आहे.मागील काही वर्षे देखील डॉ. सुगवेकर हे कुपोषणाने त्रस्त असलेल्या बालकांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याआधी त्यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत पवार, डॉ. रमेश गवळी, एकात्मिक बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिका जयश्री कांबळे, कार्तिकी मोकाशी, आरती तेलखडे यांच्यासह आरोग्य विभागाचे आरोग्यसेवक, आरोग्यसेविका,अंगणवाडी सेविका यांना कुपोषण कमी करण्यासाठी कशाप्रकारे सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, त्या बालकांची काळजी कशी घेतली पाहिजे? याबद्दल सविस्तर चर्चा केली. त्या १९ अतितीव्र म्हणजे सॅम श्रेणीत असलेल्या बालकांवर उपचार करून त्यांना खालच्या श्रेणीत किंवा कुपोषणाबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झालेआहेत.नेरळसारख्या काहीशा शहरी भागात १९ अतितीव्र म्हणजे सॅम आणि ४२ मध्यम म्हणजे मॅम श्रेणीतील बालके आढळून आल्याने आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालकल्याण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.>नेरळमध्ये ४२ मध्यम कु पोषित बालकेकुपोषणाच्या दृष्टचक्र ातून अतितीव्र अशा १९ बालकांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रयत्न सुरू केले आहेत. डॉ. सुगवेकर यांनी आपल्या रुग्णालयात नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीमधील १९ कुपोषित बालकांची तपासणी करून घेतली . त्यांना पुढील १५ दिवसांचा औषधांचा साठा वजन वाढण्यासाठी, उंची वाढण्यासाठी दिली. त्या वेळी प्रामुख्याने त्या कुपोषित बालकांच्या पालकांना विशेष सूचना दिल्या. साधारण ४० गावांचा परिसर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत असल्याने बालकांना तपासणीसाठी घेऊन यायला पालकांना वेळ नसेल तर स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, एकात्मिक बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिका यांनी काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.त्यामुळे अशा नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे नेरळ परिसरातील १९ अतितीव्र कुपोषित बालकांचे कुपोषण कमी होण्यास मदत मिळणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीत ४२ मध्यम कुपोषित बालके आहेत, त्यांना सर्वसाधारण गटात आणण्यासाठी आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालकल्याण विभाग सरसावला आहे. त्या ४२ बालकांची आरोग्य तपासणी आणि त्यांच्यावर उपचार अन्य ठिकाणी असलेल्या खासगी डॉक्टरांकडून केले जात आहेत.त्यामुळे असे प्रयत्न सातत्याने झाल्यास नेरळ परिसर कुपोषणमुक्त होण्यास मदत होईल.आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात अनेक वाड्या या दुर्गम भागात वसल्या आहेत.येथील आदिवासी कुटुंबाला रोजगाराच्या समस्यांनी ग्रासले असल्याने त्या ठिकाणी कुपोषण दिसून येत आहे. अशा कुटुंबाविषयी मनात तळमळ असलेल्या डॉ. उपेंद्र सुगवेकर यांनी आपल्या आर्थिक उत्पन्नाकडे न पाहता बांधिलकीच्या भावनेतून उपचार सुरू केले आहेत.त्यांच्या या भूमिकेला आम्ही सर्वतोपरी मदत करीत असून सॅम श्रेणीतील बालके सुदृढ होण्यासाठी मदत करीत आहोत.- डॉ. संकेत पवार,वैद्यकीय अधिकारी नेरळसॅम आणि मॅम श्रेणीत असलेल्या बालकांना सर्वसाधारण गटात आणण्यासाठी डॉ. सुगवेकर यांनी सुरू केलेले प्रयत्न सर्व ठिकाणी बालरोग तज्ज्ञ यांनी सुरू केल्यास तालुका लवकरच कुपोषणमुक्त होईल. डॉ. सुगवेकर हे प्रत्येक पालकाला सांगत असलेल्या सूचनांचे पालक पालन करतात की नाही याची जबाबदारी आम्ही अंगणवाडी सेविकेला दिली आहे.- जयश्री कांबळे,ज्येष्ठ पर्यवेक्षिका,एकात्मिक बालकल्याण विभाग