शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

पालकांनो, बालकांना सांभाळा, 'व्हायरल फिव्हर' चा वाढतोय धोका!

By निखिल म्हात्रे | Updated: January 12, 2024 15:39 IST

वातावरणातील बदलामुळे येत्या काळात बालकांमध्ये व्हायरल फिव्हरचा धोका वाढण्याची शक्यता बालरोग तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

निखिल म्हात्रे,अलिबाग :  सततच्या वातावरणातील बदलामुळे येत्या काळात बालकांमध्ये व्हायरल फिव्हरचा धोका वाढण्याची शक्यता बालरोग तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. हिवाळा जितका आल्हाददायक आहे, तेवढाच आजारांना निमंत्रण देणारा ठरतो, असे वैद्यकीय क्षेत्रात मानले जाते. योग्य ती काळजी घेतली नाही तर साथीच्या आजारांची संख्या हिवाळ्यात वाढते. त्यातच लहान मुलांचे या वातावरणामुळे बिघडण्याची शक्यता अधिक असते. यावर वेळीच उपाययोजना करून आजारांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. या दिवसात लहान मुलांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी पालकवर्गावर असते.

टायफॉईड, मलेरिया, कॉलरा, डायरिया, गॅस्ट्रो हे साथीचे आजार पसरण्याची भीती असते. दूषित पाण्यामुळेही अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. हवामानातील सततच्या बदलामुळे नियमित उकळलेले पाणीच मुलांना प्यायला देण्याचा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला. अवश्यक ती काळजी घेतली नाही तर बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकला, सीझनल फ्लू म्हणजे एनफ्लुएंझाची लक्षणे आढळण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. पालकांनी बालकांची काळजी घेण्याची गरज आहे.

सध्या घ्यावयाची काळजी!

घाण, कचरा, चिखल व पाणी तुंबून ठेवणारी गटारे यामुळे आजाराची लागण जलद होत असते. वैयक्तिक आणि परिसराची स्वच्छता ठेवावी.

 ताजे व शिजवलेले अन्न मुलांना द्यायें, तसेच आईस्क्रीम, कुल्फी, बर्फजन्य पदार्थ टाळावेत. मुलांना हलका आहारच द्यावा.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार करावा.

सततच्या बदलत्या हवामानामुळे होणारे आजार -

सर्दी, ताप, खोकला, अतिसार, जुलाब, गॅस्ट्रो आणि सीझनल फ्लू म्हणजे एनफ्लुएंझा तसेच कॉलरा, मलेरिया, चिकनगुणिया, डेंग्यू हे आजार उदभवू शकतात. त्यामुळे आजाराची लागन पाहता वैयक्तिक आणि परिसराची स्वच्छता ठेवावी.

या दिवसात आवश्यक ती काळजी घेतली नाही तर लहान मुलांमध्ये व्हायरल फिव्हरचा धोका वाढतो. तूर्तास तरी व्हायरल फिव्हरचा धोका नसला तरी वातावरणातील बदलामुळे आगामी काळात सर्दी, ताप, खोकला यासह जलजन्य आजाराची शक्यता नाकारता येत नाही - डॉ. महालींग क्षीरसागर, बालरोग तज्ज्ञ.

टॅग्स :alibaugअलिबागHealth Tipsहेल्थ टिप्स