पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:59 IST2018-10-16T22:58:56+5:302018-10-16T22:59:14+5:30
पनवेल : पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱयावर अनोळखी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात ...

पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर हल्ला
पनवेल : पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱयावर अनोळखी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
संदीप खाणावकर पनवेल महापालिकेत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी कामावर जात असताना कळंबोलीत सुधागड शाळेजवळ संदीपच्या मागूनच येणाऱया दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नसून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. हल्लेखोरांनी दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढल्याने पोलीस तपासात दुचाकीच्या मालकाची माहिती उघड झाल्यास आरोपीचा शोध घेणे सोपे जाणार आहे. जखमी संदीपवर कळंबोली रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. आयुक्त गणेश देशमुख, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, तसेच उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी जखमी कर्मचाऱयाची भेट घेतली.
कर्मचाºयावरील हल्ल्याच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तपास योग्य दिशेने सुरू असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल.
- मच्छींद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली.