शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

पनवेल: तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,  तीन हजार बेडसह ६४३ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 09:01 IST

काेराेनाची लस देण्याचा कार्यक्रम रडतखडत सुरू आहे. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना सुरक्षा कवच प्राप्त झाल्याचा दावा सरकार आणि प्रशासन करत आहेत.

आविष्कार देसाईरायगड : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने अवघे जग हतबल झाले असतानाच आता तिसऱ्या लाटेने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. लहान मुले, गर्भवती महिला, दुर्गम भागातील आदिवासीना तिसऱ्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपासून प्रभावी मुकाबला करता यावा यासाठी जिल्हा प्रशासानाने विविध रुग्णालयांत तबल तीन हजार ऑक्सिजन बेडची तयारी केली आहे. जिल्ह्यासाठी पनवेल येथे बालराेग टास्क फाेर्स स्थापन्यात आले आहे.काेराेनाची लस देण्याचा कार्यक्रम रडतखडत सुरू आहे. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना सुरक्षा कवच प्राप्त झाल्याचा दावा सरकार आणि प्रशासन करत आहेत. तिसरी लाट येईपर्यंत १८ ते ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये प्रामुख्याने गर्भवती महिला, लहान मुले आणि दुर्गम भागात राहणारे आदिवासी नागरिक हे प्रभावित हाेण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्यात जाेरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय, माणगाव आणि पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड वाढवण्यात येत आहेत. सध्या दाेन हजार ४४९ ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ५०० ऑक्सिजन, अशा एकूण तीन हजार ऑक्सिजन बेडची व्यवस्था हाेणार आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना त्रास हाेणार असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. यासाठी त्यांना तातडीने सर्वताेपरी उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यासाठी पनवेल येथे बालराेग टास्क फाेर्स स्थापण्यात आले आहे. ऑक्सिजनची क्षमताही वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या ६४३ मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये आणखीन सात हजार मेट्रिक टनांची वाढ करण्यात येत आहे. तर, जिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लांट उभारण्यात येत आहे. आयसीएमआरच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलबद्दल नर्स, पॅरामेडिक्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. एमजीएम, लाइफलाइन, स्वस्थ असे खासगी रग्णालये स्वतंत्र कोविड पेडियाट्रिक सुविधांवर काम करत आहेत.

ऑक्सिजनसध्या ६४३ मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते. त्यामध्ये आणखीन सात हजार मेट्रिक टनची वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार ६५० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन घेणारा रायगड एकमेव जिल्हा असेल. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयामध्येही ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लांट उभारण्यात येत आहे.

ऑक्सिजन बेडअलिबाग येथील जिल्हा रुग्णालय, माणगाव आणि पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविण्यात येत आहेत. सध्या दाेन हजार ४४९ ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ५०० ऑक्सिजन बेड, असे एकूण तीन हजार ऑक्सिजन बेडची व्यवस्था हाेणार आहे.

काेविड केअर सेंटररायगड जिल्ह्यामध्ये १९, तर पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये एक असे २० काेविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहेत.

औषधांची उपलब्धताकाेराेनाशी दाेन हात करण्यासाठी आवश्यक ती सर्व औषधे जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत, तसेच रेमडेसिविरसारख्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध हाेत आहे, तसेच ताे निरीक्षण यंत्रणेमार्फत मागणी केलेल्या रुग्णालयांना देण्यात येत आहे.

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तिसऱ्या लाटेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, दुर्गम भागात राहणारे आदिवासी नागरिक प्रभावित हाेण्याची शक्यता आहे. यासाठी बालराेगतज्ज्ञ डाॅक्टरांची बैठक घेण्यात आली. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाचार करण्याबाबत संबंधित यंत्रणेला अवगत करण्यात येत आहे. ऑक्सिजन, ऑक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात आली आहे. नागरिकांनीही जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. लवकरच आपण या महामारीतून बाहेर येऊ.- निधी चाैधरी, जिल्हाधिकारी, रायगड 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरOxygen Cylinderऑक्सिजन