शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पाली धनगरवाडा प्रकाशमय, स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 07:02 IST

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहोचली आहे.

- कांता हाबळेनेरळ - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहोचली आहे. त्यामुळे आता तरुणांना शिक्षण, आरोग्य आणि शेतीकडे लक्ष देण्यासाठी या वीजपुरवठ्याचा पुरेपूर उपयोग होणार असल्याचे येथील नागरिक रामा खरात यांनी सांगितले. त्यामुळे तेथील धनगर बांधवांनी आनंदोत्सव साजरा करत एकच जल्लोष केला.२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत विद्युतपुरवठा नियमित करण्यात आला. याठिकाणी ६३ के व्हीचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून सिंगल फेज लाइन खेचण्यासाठी एसटी लाइनचे बारा विद्युत पोल आणि एलटी लाइनचे सात पोल उभे करून लाइन बसविण्यात आली. या ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते बाबू घारे आणि विद्युत वितरण महामंडळाचे अविनाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या या पाली धनगरवाड्याचे पाली गावापासूनचे अंतर दोन ते तीन किलोमीटर आहे. येथील लोकसंख्या तीस ते चाळीसच्या आसपास असून येथे धनगर बांधवांची सात घरे आहेत. पूर्व परंपरागत दुग्ध व्यवसाय हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.देश स्वतंत्र झाल्यापासून येथे वीजच पोहोचली नसल्याने त्यांचा सर्वांगीण विकासच खुंटला होता. आता मात्र येथे वीजपुरवठा कायमस्वरूपी होणार आहे. त्यामुळे गावाच्या सर्र्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या धनगरवाड्यामध्ये प्रथमच विद्युतपुरवठा सुरू होत असल्याने येथील नागरिकांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्ही ते वातावरण टिकवून ठेवण्यासाठी आणि वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू.- ए. ई. घुले, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कर्जतयेथे बारा विद्युत पोल आणि एलटी लाइनचे सात पोल उभे करून लाइन बसवली. त्याचे उद्घाटन सेना उपतालुकाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते बाबू घारे आणि विद्युत वितरण महामंडळाचे अविनाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :electricityवीजRaigadरायगड