शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पीओपी गणेशमुर्तींना विरोध: अंधारात ठेवून नव्या नियमावलीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 06:50 IST

पेण हे गणपतीचे माहेरघर आहे. लाखो गणेशमूर्ती पेणमध्ये तयार केल्या जातात.

अलिबाग : पीओपी हे पर्यावरणपूरक आहे, असे शास्त्रज्ञ म्हणत असताना मुंबई पालिकेने नवीन नियमावलीद्वारे अशा मूर्ती तयार करून विसर्जित करण्यास बंदी घातली आहे. याविरोधात मूर्तिकार आंदोलन छेडणार असल्याचे राज्य मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  

पेण हे गणपतीचे माहेरघर आहे. लाखो गणेशमूर्ती पेणमध्ये तयार केल्या जातात. गणेशमूर्ती व्यवसायातून काेट्यवधींची उलाढाल दरवर्षी होते. या व्यवसायावर हजारो जणांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. अशात पीओपी मूर्ती विसर्जित करण्यास बंदी घातल्याने मूर्तीकारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. आझाद मैदानावर हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे मूर्तिकारांनी सांगितले. 

मूर्तिकांराना फटकाउच्च न्यायालयाने पीओपी मूर्तींवर बंदीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबई पालिकेने पीओपी मूर्तींवर बंदीचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फटका अशा गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांना बसला आहे. त्यामुळे पेण येथे शुक्रवारी राज्यातील गणेश मूर्तिकार व्यावसायिक एकत्र आले होते. मात्र, न्यायालयाने पीओपीवर बंदी घातली असून, हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. त्यामुळे मूर्तिकार कसा तोडगा काढणार, याकडे लक्ष लागले आहे. 

पीओपी मूर्तींवरील बंदीमुळे मूर्तिकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. पीओपी हे पर्यावरणाला घातक नाही, असे शास्त्रज्ञ म्हणत आहेत.  त्यामुळे आंदोलन करणार आहोत. मूर्ती व्यावसायिकांशी सरकारने संवाद साधणे आवश्यक आहे.   अभय म्हात्रे, अध्यक्ष, राज्य मूर्तिकार संघटना

पीओपी पर्यावरणाला घातक नाही. याचे तपासणी अहवाल आमच्याकडे आहेत. न्यायालयाने पीओपीसंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगूनही शासनाने तीन वर्षे तो दिला नाही. शासनाने मूर्तिकरांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते.  कुणाल पाटील, मूर्तिकार, हमरापूर, पेण

टॅग्स :environmentपर्यावरण