शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होणार? भविष्यातील रणनीतीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलणार
2
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली
4
न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले
5
कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले
6
आजचे राशीभविष्य - शनिवार १५ जून २०२४; यश, कीर्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल
7
40 ALL OUT! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं
8
दहशतवाद्यांचे टार्गेट काश्मीरऐवजी जम्मू, पर्यटकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न
9
दीड टक्के मते वाढवा, विधानसभा आपलीच; देवेंद्र फडणवीसांनी दिला विश्वास
10
आता घरी लागणार नाहीत 'स्मार्ट मीटर', लहान व्यावसायिकांनाही वगळले, सरकारकडून जनआक्रोशाची दखल
11
YO-YO Test मध्ये पास न होणाऱ्यांना संघातून वगळणं चुकीचंच; गंभीरचं रोखठोक मत
12
"ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न 
13
भाजप वादग्रस्त विधेयके ठेवू शकते थंडबस्त्यात, संसद अधिवेशनात 'सहमती' हा नवीन मंत्र
14
केंद्र सरकारने काढले नाफेडचे कांदा दरनिश्चितीचे अधिकार
15
परस्पर संवाद, मुत्सद्देगिरीतूनच शांततेचा मार्ग जातो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विधान
16
Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
17
शीना बोराच्या जळालेल्या हाडांचे अवशेष गायब, हाडे सापडत नसल्याची सीबीआयची कोर्टात कबुली
18
सोशल मीडियावर वाढली अश्लीलता; मुले बिघडली, कुटुंबातील संवाद झाला कमी
19
'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
20
अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा

एक महिन्याच्या बाळाच्या छोट्या आतड्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 5:04 AM

कातकरी समाजातील एका महिन्याच्या बालकावर अलिबागमधील डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी छोट्या आतड्यावर शस्त्रक्रिया केली. अशा पद्धतीची शस्त्रक्रिया अलिबागमध्ये प्रथमच करण्यात आली आहे.

अलिबाग : कातकरी समाजातील एका महिन्याच्या बालकावर अलिबागमधील डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी छोट्या आतड्यावर शस्त्रक्रिया केली. अशा पद्धतीची शस्त्रक्रिया अलिबागमध्ये प्रथमच करण्यात आली आहे.या मुलास जन्मल्यापासून दूध वा काहीही प्यायल्यावर त्यास लगेच उलटी होत होती. मुलाचे वजनदेखील कमी होत होते. पालकांनी या मुलास अलिबागमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्याकडे तपासणीकरिता नेले. मुलाच्या जठरातून छोट्या आतड्याकडे येणारा मार्ग जन्मत: छोटा असल्याचे प्राथमिक निदान त्यांनी केले. या बाबत खातरजमा करण्याकरिता डॉ. चांदोरकर यांनी रेडिओलॉजिस्ट डॉ. अनिता शेटकर यांच्याकडे सोनोग्राफीकरिता पाठविले. सोनोग्राफीअंती डॉ. अनिताशेटकर यांनी केलेले प्राथमिकनिदान खात्रिशीर असल्याचे निश्चित केले.बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी तत्काळ ज्येष्ठ सर्जन डॉ. एस. एन. तिवारी यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पालकांना या बाबत सांगून बुधवारी डॉ. तिवारी यांनी ही अत्यंत जिकरीची शस्त्रक्रिया प्रत्यक्षात आणली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, मुलगा शुद्धीवर आला आणि पालकांसह सर्व डॉक्टर्सदेखील सुखावून गेले. मुंबई सारख्या ठिकाणी गेल्यावर खर्च आणि खूप फिरावे लागले असते. नातेवाइकांचे खूप हाल होतात, या सर्वाविना आणि सर्व डॉक्टरांच्या सहकार्यामुळे आमच्या मुलाची शस्त्रक्रिया येथेच होऊ शकली, या बाबत बालकाच्या पालकांनी आनंद व्यक्त करून डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.भूल देऊन शस्त्रक्रिया जिकरीचीअवघ्या एक महिन्याच्या बाळाला भूल देऊन शस्त्रक्रिया करणे अत्यंत जिकरीचे असते. मात्र, या चौघा डॉक्टरांचा अनुभव आणि सांघिक प्रयत्नामुळे हे शक्य होऊ शकले आहे. बालकाच्या पालकांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन ही शस्त्रक्रिया अत्यल्प खर्चात करण्यात आली.

टॅग्स :Raigadरायगड