दरड कोसळून एकाचा मृत्यू; नरवीर टीमच्या सहाय्याने पोलिसांना काढला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 11:48 IST2023-07-28T11:47:01+5:302023-07-28T11:48:17+5:30

नरवीर टीमच्या शिलेदारांनी प्रचंड पावसात रात्री तीन तास आथक प्रयत्न करून दरडीतून आणी जंगलातून दोरखंडाच्या सह्याने मृतदेह वरती काढला

One died in a landslide; Police removed the body with the help of Narveer team | दरड कोसळून एकाचा मृत्यू; नरवीर टीमच्या सहाय्याने पोलिसांना काढला मृतदेह

दरड कोसळून एकाचा मृत्यू; नरवीर टीमच्या सहाय्याने पोलिसांना काढला मृतदेह

जमीर काझी

अलिबाग: रायगड जिल्ह्यात सर्वत्र  मुसळधार पाऊस सुरू असून गुरुवारी रात्री महाड तालुक्यातील रेवतळे येथील बंगल्यावरील स्वामी समर्थ मंदिराच्या मागील बाजूच्या साईटच्या डोंगरातील मोठी दरड कोसळली. त्यामध्ये एक आनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. मृतदेह आडळ्याचा आणि दरडीमधून काढण्यासाठी महाड पोलिंसाकडून विनंती करण्यात आली.

नरवीर टीमच्या शिलेदारांनी प्रचंड पावसात रात्री तीन तास आथक प्रयत्न करून दरडीतून आणी जंगलातून दोरखंडाच्या सह्याने मृतदेह वरती काढला मध्यरात्री एकच्या सुमारास काढण्यात आला. मृतदेह रुग्णालयात नेण्यात आलेले असून अद्याप मृताची ओळख पटलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: One died in a landslide; Police removed the body with the help of Narveer team