सुधागडमध्ये तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एकास अटक, गुन्हेगारीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 05:30 IST2017-09-10T05:30:29+5:302017-09-10T05:30:36+5:30
सुधागड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खून, चो-या, दरोडा, विनयभंग आदी घटनांच्या प्रकारात वाढ झाली आहे. सुधागड तालुक्यातील चंदरगाव आदिवासीवाडी येथील तरुण अंकुश तांबड्या वाघमारे (२५), याला अमानुषपणे मारहाण करून, त्याचा खून केल्याची घटना नुकतीच घडली.

सुधागडमध्ये तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एकास अटक, गुन्हेगारीत वाढ
राबगाव / पाली : सुधागड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खून, चो-या, दरोडा, विनयभंग आदी घटनांच्या प्रकारात वाढ झाली आहे. सुधागड तालुक्यातील चंदरगाव आदिवासीवाडी येथील तरुण अंकुश तांबड्या वाघमारे (२५), याला अमानुषपणे मारहाण करून, त्याचा खून केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
तांबड्या नवश्या वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगा अंकुश वाघमारे व त्याची पत्नी सुशा यांचे घरात भांडण झाल्याने व तिला मारहाण केल्याने या गोष्टीचा राग मनात धरून, सुशा हिचे भाऊ नितीन बारकू हिलम व सचिन बारकू हिलम यांनी अंकुश वाघमारे यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना दगडावर आपटले. यात गंभीर जखमी झालेल्या अंकुशला पेणच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी आदिवासीवाडीत भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. याबाबत पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.