आता लग्नाची परवानगी म्हणजे अग्निदिव्यच; यजमानांना करावी लागतेय कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 11:46 PM2020-12-17T23:46:26+5:302020-12-18T06:47:45+5:30

सध्या काेराेनामुळे लग्नकार्यामध्ये प्रशासकीय परवानगी काढणे बंधनकारक केले आहे.  त्यामुळे परवानग्या प्राप्त करताना दाेन्ही बाजूंची चांगलीच दमछाक हाेत आहे.

Now the permission of marriage is fire; Hosts workout | आता लग्नाची परवानगी म्हणजे अग्निदिव्यच; यजमानांना करावी लागतेय कसरत

आता लग्नाची परवानगी म्हणजे अग्निदिव्यच; यजमानांना करावी लागतेय कसरत

Next

रायगड : शादी का लड्डू खाये ताे पछताये, जाे न खाये वाे भी पछताये, अशी हिंदीमध्ये म्हण आहे. परंतु लग्नबंधनामध्ये अडकणाऱ्या दाेन कुटुंबांना सध्या विलक्षण अनुभव घ्यावा लागत आहे. सध्या काेराेनामुळे लग्नकार्यामध्ये प्रशासकीय परवानगी काढणे बंधनकारक केले आहे.  त्यामुळे परवानग्या प्राप्त करताना दाेन्ही बाजूंची चांगलीच दमछाक हाेत आहे.

लग्नामुळे फक्त नवरा-बायकाेच नव्हे, तर दाेन्ही कुटुंबे जाेडली जातात. त्यामुळे दाेन्हीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. काेराेनामुळे सर्वांचेच जीवनमान बदलले आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखता यावा म्हणून सरकारने लग्नसराईसाठी विविध नियम लागू केले आहेत. नियमांचे पालन करताना सरकारी परवानग्या काढाव्या लागत आहेत. परवानग्या काढताना वधू आणि वर पक्षाच्या नाकीनऊ येत आहेत. परवानग्या काढताना धावपळ हाेत असल्याने सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

परवानगी काढणे गरजेचे आहे हे मान्य, परंतु एका परवानगीसाठी किमान आठ दिवस लागत आहेत. त्यामुळे अन्य कामांकडे लक्ष द्यायचे की परवानग्या काढायच्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे वरपिता आणि वधुपिता  हैराण झाले आहेत.

लग्नासाठी नियमावली
कोरोनामुळे हळद, लग्न समारंभ अथवा तत्सम कार्यक्रमास ५० पेक्षा अधिक माणसे बोलवण्यास बंदी आहे. त्यापेक्षा जास्त नागरिक जमा झाल्यास आणि त्यांच्या तोंडावर मास्क नसल्यास प्रती वऱ्हाडी २०० रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशी बंधने घालण्यात आली आहेत.

सरकारने काेराेनाला राेखण्यासाठी नियमावली दिली आहे. हे चांगले आहे, मात्र परवानगीसाठी खूपच दमछाक हाेते. वेळेवर कर्मचारी, अधिकारी उपस्थित नसल्याने सारख्या चकरा माराव्या लागतात. वेळ तर जाताेच शिवाय मनस्ताप सहन करावा लागताे ताे वेगळाच.
- रामचंद्र पाटील, वरपिता

परवानगीसाठी 
माेठी कसरत
लग्नकार्यासाठी सभागृहामध्ये बुकिंग केले असल्याचे पत्र तसेच परवानगीसाठी ग्रामपंचायत अथवा पालिका कार्यालयात अर्ज करावा लागताे. वधू आणि वराचे आधारकार्ड, जन्माचा दाखला टीसी, रहिवाशी दाखला हे पुरावे लागतात. सदरचा अर्ज पाेलिसांकडे द्यावा लागताे. त्यानंतर परवानगी मिळते. या कालावधीत एकाही यंत्रणेचा अधिकारी अथवा कर्मचारी कार्यालयामध्ये उपस्थित नसला तर प्रक्रियेला वेळ लागताे. त्यासाठी कार्यालयात सारखे हेलपाटे मारावे लागतात.

परवानग्या काढणे ही चांगलीच डाेकेदुखी झाली आहे. आधीच मुलीच्या लग्नाचे टेंशन त्यातच सर्व परवानग्या काढायच्या. लग्नासाठी माणसांचे बंधनही आहे, पण ठरावीक नातेवाइकांना लग्नासाठी बाेलावल्यास अन्य नातेवाईक रुसण्याची शक्यता आहे. आम्ही नियम पाळूच, पण परवानग्या काढताना दमछाक हाेते.
- जयंत पाटील, वधुपिता

Web Title: Now the permission of marriage is fire; Hosts workout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न