शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आता लगबग आदिशक्तीच्या आगमनाची; बुधवारी होणार घटस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 06:05 IST

गणेशोत्सवानंतर आता रायगडकरांना वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. बुधवार, १० आॅक्टोबर रोजी आदिशक्तीचे आगमन होणार आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये एक हजार २८६ घट स्थापन केले जाणार आहेत

- आविष्कार देसाईअलिबाग : गणेशोत्सवानंतर आता रायगडकरांना वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. बुधवार, १० आॅक्टोबर रोजी आदिशक्तीचे आगमन होणार आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये एक हजार २८६ घटस्थापन केले जाणार आहेत. त्यामध्ये एक हजार १०८ सार्वजनिक तर,१७८ खासगी देवींच्या मूर्तींचासमावेश आहे. नवरात्रोत्सवानिमित्त बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी होतआहे. आदिशक्तीच्या आगमनाच्या तयारीसाठी नवरात्रोत्सव मंडळांचीही चांगलीच लगबग सुरू असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव ज्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो, त्याच आपुलकीने आणि भक्तिभावाने आदिमायेचाजागर सलग नऊ दिवस घातलाजातो. आदिशक्तीचा हा उत्सव हा स्त्रीत्वाचा उत्सव असल्याने नवरात्रोत्सवात महिलांचाच दबदबा असल्याचे पाहायला मिळते. महिलांसाठी असणारा सण हा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे. मोठ्या जल्लोषात सण साजरा करायचा म्हटला की, त्या सणासाठीची तयारीही तेवढीच उत्साहपूर्ण असली पाहिजे. यासाठी महिलावर्गाची तयारी सुरू आहे. नऊ दिवस भरणाऱ्या या उत्सवामध्ये गरबा, दांडिया मनमुरादपणे खेळला जातो. त्यामुळे नऊ दिवसांचा ड्रेसअपही तसाच पाहिजे, तसेच त्यासाठी मॅचिंग ज्वेलरी, सँडल हे सुद्धा आलेच. या सर्वांच्या तयारीसाठी लागणारी खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारात गर्दी दिसून येत आहे.सध्या महिला कॉन्ट्रास ड्रेसअप करण्याला पसंती देत असल्याचे दिसून येते. बाजारामध्ये असंख्य व्हेरायटीच्या साड्या, घागरा-चोली, लाचा, राजस्थानी पेहराव विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या दांडिया, ओढण्याही खरेदी करण्याची चांगलीच धूम आहे.हार-फुले, फळे, अगरबत्ती, धूप अशा पूजेच्या साहित्याची खरेदी जोरात सुरू आहे. घट स्थापनेसाठी लागणारी रंगबेरंगी मडकी, देवीचे मुखवटे यांनाही चांगली मागणी आहे.बुधवार, १० आॅक्टोबर रोजी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आदिशक्तीची स्थापना करण्यात येणार आहे. एक हजार २८६ घट स्थापन केले जाणार आहेत.त्यामध्ये एक हजार १०८ सार्वजनिक तर, १७८ खासगी मूर्तींचा समावेश आहे. नऊ दिवस अलिबाग येथील काळंबा मंदिर परिसरामध्ये जत्रा भरणार आहे. रायगड जिल्ह्यातील आसपासचे देवीचे भक्तगण येथे मोठ्या संख्येनेभेट देतात. चौल येथील शितळादेवी मंदिर, नागाव येथील दक्षिणमुखी देवीच्या मंदिर परिसरातही भाविकांची चांगलीच गर्दी होते. त्यामुळे मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणारआहे. दरम्यान, नवरात्रोत्सवअतिशय भक्तिमय आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा करावायासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले आहे.पनवेलमध्ये दुकाने सजलीपनवेल : दोन दिवसांत आदिशक्तीचे आगमन होणार असल्याने नवरात्रोत्सवानिमित्त पनवेलमधील बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या असून, खरेदीसाठी नागरिकांची लगबगही सुरू झाली आहे. याशिवाय पनवेलला लागूनच असलेल्या नवी मुंबई शहरातील नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आदी भागातील बाजारपेठा नवरात्रोत्सवासाठी लागणाºया साहित्यांनी सजल्या आहेत.नवरात्रोत्सवामध्येहीडीजेवर बंदी कायम!नवरात्रोत्सवामध्ये, तसेच मिरवणुकीच्या वेळेस डीजेवर बंदी कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे नऊ दिवस चालणाºया देवीच्या उत्सव कालावधीतही त्याचा वापर करता येणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यामध्ये देवीचा उत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील नियमित बंदोबस्त तैनात राहणार आहे. शिवाय त्यांच्या मदतीला होमगार्डही राहणार आहेत.मुख्यालयाच्या ठिकाणी दोन स्ट्रायकिंग फोर्स ठेवण्यात येणार आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ व माणगाव या दोन ठिकाणी आरसीपी फोर्स तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली.

टॅग्स :Raigadरायगड