शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

नेरळ - माथेरान मिनीट्रेन सेवा उदासीनतेच्या गर्तेत; लोकोशेडचे काम अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:00 PM

रेल्वेमार्गाच्या निधीचा अन्यत्र वापर करण्यात येत असल्याच्या तक्रारी; स्थानिकांसह पर्यटकांमधून नाराजी

मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरान पर्यटनस्थळाचा केंद्र्रबिंदू असलेली नेरळ - माथेरान मिनीट्रेन सेवा रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेची बळी पडत आहे. येथील मार्गाचे काम कूर्मगतीने सुरू असल्याने ही सेवा येत्या पर्यटन हंगामामध्ये तरी सुरू होईल का? असा प्रश्न स्थानिक तसेच व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.

माथेरानमध्ये पर्यटकांचे खास आकर्षण म्हणजे मिनीट्रेन सफर. या मिनीट्रेनची सफर करण्यासाठी देशविदेशातून पर्यटक माथेरानला भेट देतात; मात्र हीच मिनीट्रेन बंद असल्यास पर्यटनस्थळावर मंदीची अवकळा पसरते. गतवर्षी पावसाळ्यात नेरळ - माथेरान मिनीट्रेन मार्गाची मोठी हानी झाली होती.

अनेक ठिकाणी दरडी पडल्या, रेल्वे मार्गाखालील भराव वाहून गेल्याने माथेरानला येणारी गाडी बंद झाली होती. त्याचा फटका येथील अमन लॉज ते माथेरान शटल सेवेसही बसला होता. त्या वेळी माथेरान येथे एक सुसज्ज लोकोशेड असावे, असा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यादृष्टीने कामही सुरू करण्यात आले होते.

सध्या नेरळ - माथेरान मार्गाची डागडुगी करून तात्पुरती माथेरानपर्यंत गाडी येण्यापुरते काम केले गेले व शटलसेवा सुरू झाली; पण लोकोशेडचे काम मात्र जवळ जवळ बंद झाले आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा असा प्रसंग उद्भवल्यास मिनीट्रेन पुन्हा बंद होऊ शकते. पर्यटकांचे खास आकर्षण असलेली नेरळ - माथेरान सेवा लवकर सुरू व्हावी, अशी मागणी माथेरानकरांकडून जोर धरत आहे.प्रत्येक पावसाळ्यात माथेरान - नेरळ मार्गाची हानी होते व रेल्वे प्रशासनाकडून मार्गावरील सेवा खंडित करण्यात येते. प्रत्येक वेळी माथेरानकरांना सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. रेल्वे मार्गासाठी प्रशासनाकडून मोठा निधी उपलब्ध होत असला तरी प्रत्यक्षात तो मार्गाच्या दुरुस्तीऐवजी इतरत्र खर्च केला जातो. त्यामुळे मिनीट्रेनच्या मार्गातील धोकादायक ठिकाणे अधिकच धोकादायक होत आहेत. दर पावसाळ्यात हीच स्थिती उद्भवत असल्याने कामचुकार अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.माथेरान स्थानकात लोकोशेडचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून काम अपूर्णावस्थेत असून याच ठिकाणी लहान मुले खेळत असतात. लोकोशेड कामाच्या लोखंडी सळया वर असल्याने तसेच पावसाळ्यात पाणी साठून एखाद्या व्यक्तीला अथवा लहान मुलांना अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकोशेडचे काम पूर्ण होणार नसेल तर या ठिकाणी भराव टाकण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Matheranमाथेरान