राष्ट्रवादीची आज निर्धार परिवर्तन यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 03:49 IST2019-01-10T03:49:08+5:302019-01-10T03:49:20+5:30

याच वेळी रायगड लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे राष्ट्रवादी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

NCP's today's determination change journey | राष्ट्रवादीची आज निर्धार परिवर्तन यात्रा

राष्ट्रवादीची आज निर्धार परिवर्तन यात्रा

महाड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेला गुरु वारी रायगड व महाडमधून सुरुवात होत असून, यानिमित्त शहरातील रावसाहेब भिलारे मैदानावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जाहीर सभा सकाळी ११ वाजता होणार आहे. या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

याच वेळी रायगड लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे राष्ट्रवादी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. गुरु वारी सकाळी ८ वाजता पाचाड येथील राजमाता जिजाबाई यांचे समाधीस्थळ, किल्ले रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होऊन राष्ट्रवादीचे नेते अभिवादन करतील, त्यानंतर चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करून आयोजित सभेला संबोधित करतील.
 

Web Title: NCP's today's determination change journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.