पनवेलमध्ये इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 12:20 IST2018-09-05T12:17:19+5:302018-09-05T12:20:06+5:30
वाढत्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खारघरमध्ये बुधवारी निदर्शनं करण्यात आली.

पनवेलमध्ये इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं
वैभव गायकर
पनवेल - वाढत्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खारघरमध्ये बुधवारी (5 सप्टेंबर) निदर्शनं करण्यात आली. यावेळी वाहन चालकांना गाजर वाटप करण्यात आले. तसेच जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील यांनी बैलगाडीवर बसून मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
खारघर उत्सव चौकापासून हिरानंदानी उड्डाणपुलापर्यंत रॅली काढून निदर्शनं करण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनोज शारबिद्रे, संध्या शारबिद्रे, सुनील घरत आदिसह शेकडो संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.