शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

निसर्ग चक्रीवादळ बाधित मच्छीमार दुर्लक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 00:54 IST

या नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे केले गेले. मात्र, हे पंचनामे करताना मच्छीमारांचे नुकसान डावलले गेल्याचे मत आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केले.

आगरदांडा : मुरुड किनाऱ्यावर प्रघात केलेल्या निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. या नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे केले गेले. मात्र, हे पंचनामे करताना मच्छीमारांचे नुकसान डावलले गेल्याचे मत आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केले.वादळी लाटांनी मासेमारी नौकांमध्ये पाणी भरल्याने इंजिनाचे झालेले नुकसान, होड्या एकमेकांवर अथवा किनाºयावर आदळून मोठे नुकसान झाले आहे. वादळापूर्वी समुद्रात टाकलेली जाळी पुन्हा परत आणू न शकल्याने, जाळी वाहून गेल्याचे पंचनामे अथवा किनाºयावर शाकारून ठेवलेल्या नौकांवरील बंदिस्ती उडून गेली, घरातीचे छत आणि कौले उडाल्याने पावसाळ्यासाठी साठवून ठेवलेल्या सुक्या मासळीच्या झालेल्या नुकसानीचे पाहणी कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील यांनी केली. यावेळी कोळी समाजाने आपल्या व्यथा मांडल्या. कोळी बांधवांचे या वादळामुळे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर संकट ओढावले आहे. यामध्ये १३ बोटींचे २ लाख ५० हजार रुपयांचे तर लिलाव शेडचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, कोळी समाज उद्ध्वस्त झाला आहे, अशी व्यथा सागरकन्या मच्छीमारी सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले यांनी कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील यांच्यासमोर मांडली. निसर्ग प्रकोप होऊनही १८ दिवसांनंतर झाले, तरी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असून, कोणत्याच गावाला वीजपुरवठा होत नाही असल्याचे पाटील यांनी सांगितले.कोळी बांधवांना भरपाई वाढवून न दिल्यास येणाºया अधिवेशनात आवाज उठवून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून जास्तीतजास्त भरपाई कशी मिळेल, याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आ. पाटील यांनी दिले. यावेळी मुरुड मच्छीमारी सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू आदी उपस्थित होते.>‘वादळग्रस्तांना घरकुल मिळवून देणार’तळा : मांदाड येथील पाण्याचा प्रश्न, चक्रीवादळात शाळेतील झालेले कॉम्पुटर आणि प्रींटरचे नुकसान मी माझ्या आमदारकीच्या फंडातून करुन देणार असल्याचे आश्वासन आ.रमेश पाटील यांनी तळा येथे पाहणी दरम्यान दिले. पूर्णत: नुकसान झालेल्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळवुन देण्याचे आश्वासन दिले, त्याचप्रमाणे प्रत्येक मच्छीमार बांधवांनी बँकेत किसान क्रेडिट कार्ड काढुन व्यवसाय करावा, समुद्रा शेजारी मच्छशेती करुन त्यातून कर्ज फेडुन समृद्ध व्हावे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले. या पाहणी दौºयाच्या आधी चक्रीवादळात नुकसान झालेल्या तळा प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी आ.रमेश पाटील यांनी केली. संपुर्ण प्राथमिक केंद्र, डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या वसाहतीचे मोठे नुकसान झाले असून आज अठरा दिवस होऊन गेले तरी जिल्हा आरोग्य विभागाकडून तातडीची मदत न मिळाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. पावसाळ्याच्या दिवसात गळत्या रुममध्ये डॉक्टर रुग्णांना कशी सेवा पुरवणार असा प्रश्न उपस्थित करुन जिल्हा आरोग्य विभागाला जाब विचारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.>वाढीव भरपाईसाठी प्रयत्नशील : मासळीचा दुष्काळ अथवा चक्रीवादळमध्ये झालेले मच्छीमारांचे नुकसान असो, यामध्ये नेहमी शासन कोळी समाजावर अन्याय करीत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी यावेळी केला. मच्छीमारांना भरपाई वाढवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितल.

टॅग्स :cycloneचक्रीवादळ