शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

वणव्यांमध्ये होरपळतेय रायगडची निसर्गसंपदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 01:27 IST

वनविभागाच्या उदासीन धोरणामुळे तत्काळ उपाययोजना नाही; श्रीवर्धनमधील वेळासच्या डोंगरावरील वनसंपत्तीची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : श्रीवर्धन तालुक्‍यातील दिघी रस्त्याला असणाऱ्या वेळास गावाच्या हद्दीतील वनविभागाच्या डोंगराला लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली असून जनावरांचा चाराही नष्ट झाला. मात्र या वणव्यांकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवते.वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या वेळास परिसरातील डोंगरावर रविवारी रात्री वणवा लागला. या वणव्यात जवळपास दोन ते पाच हेक्टर परिसर जाळून खाक झाला . यात लहान झाडे, शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठविलेल्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वणवा विझवण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जाळपट्टे काढले जात नाहीत. त्यामुळे डोंगरच्या डोंगर आणि वनविभागाच्या हद्दीतील झाडे या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावांच्या हद्दीत असलेल्या वनविभागाच्या जंगलाला दरवर्षी वणवे लागतात. मात्र वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडून प्रभावी उपाय योजना केल्या जात नाही . शासन एकीकडे झाडे लावण्यासाठी प्रचंड अनुदान देते , जनजागृती करीत वृक्ष लावगड करते. तर दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षामुळे जंगल संपत्तीचे मात्र मोठे नुकसान होते. जाळपट्टे वेळेत काढले जात नसल्याने वणवे लागत आहेत.

आठ दिवसांतील दुसरी घटना या परिसरात दांडगूरी नंतर वेळास या ठिकाणी वणव्याची दोन आठवड्यातील दुसरी घटना आहे. दरवर्षी लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी. वनविभागाने याकडे लक्ष द्यावे आणि जंगल संपत्ती वाचविण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी केली आहे.

वेळास गावालगतच्या डोंगराला लागलेला वणव्यात अनेक वन्यजीव जळून मृत्यूमुखी पडले. दरवर्षी वणवे लागतात. मात्र, वनविभागाकडे तत्काळ वणवे विझवण्यासाठीची यंत्रणाच उपलब्ध नसते ही शोकांतिका आहे.- धवल तवसाळकर, हेल्प ग्रुप, वेळास

टॅग्स :Raigadरायगडforestजंगलfireआग