मुंबई इंडियन्स टीम अलिबागेत रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल

By राजेश भोस्तेकर | Updated: March 19, 2024 14:19 IST2024-03-19T14:18:58+5:302024-03-19T14:19:39+5:30

गेटवे येथून १२ जणांची टीम मांडवा येथे पी एन पी जलवाहतूकीने दाखल झाली आहे. 

mumbai indians team entered radisson resort in alibaug | मुंबई इंडियन्स टीम अलिबागेत रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल

मुंबई इंडियन्स टीम अलिबागेत रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: २२ मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम देशात सुरू होत आहे. मुंबई इंडियन्स टीमचा कप्तान हार्दिक पांडे यांच्या नेतृत्वाखाली खेळली जाणार आहे. मुंबई इंडियन्स टीमला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी पूर्ण टीम ही अलिबाग येथे रेडीसन रिसॉर्ट मध्ये मंगळवारी दाखल झाली आहे. दोन दिवस ही टीम रिसॉर्ट मध्ये राहणार आहे. त्यामुळे मोठा बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. गेटवे येथून १२ जणांची टीम मांडवा येथे पी एन पी जलवाहतूकीने दाखल झाली आहे. 

गेटवे येथे बसने मुंबई इंडियन्स टीम ही मंगळवारी सकाळी दाखल झाली. त्यानंतर सर्व टीम ही पीएनपी जलवाहतूककीने बसून मौज मजा करीत मांडवा येथे दाखल झाले. त्यानंतर बसने टीम ही अलिबाग गोंधळपाडा येथील रेडीसन रिसॉर्ट मध्ये दाखल झाली. यावेळी रिसॉर्ट प्रशासनाने टीमचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. एक  दिवस मुंबई इंडियन्स टीमही अलिबागमध्ये रिसॉर्टला राहणार आहेत. त्यानंतर बुधवारी टीम ही झिराड येथे एका खाजगी फार्म हाऊसवर राहण्यास जाणार आहेत. अर्जुन तेंडुलकर, पियूष चावला, लसिथ मलिंगा, पोलार्ड, शम्स मुलानी , मोहम्मद नाबी, नवथ तुषारा, टिळक वर्मा, नेहल वढेरा, प्रशिक्षक, टीम सदस्य सह ५२ जण रेडिसन रिसॉर्ट मध्ये दाखल झाले आहेत.

टीम सोंबत काढले फोटो

मुंबई इंडियन्स टीम रेडीसन रिसॉर्ट मध्ये  दाखल झाल्यानंतर रिसॉर्ट मधील नागरिकांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी लगबग सुरू होती. पीयूष चावला याच्यासोबत बच्चे कंपनीने फोटो यावेळी काढले.

Web Title: mumbai indians team entered radisson resort in alibaug