शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

मुंबई-गोवा : २ ठेकेदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; १४ वर्षांनंतर प्रथमच कारवाई, एका अधिकाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 05:25 IST

१४ वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते वडपाले या २६.७ किमी अंतरातील चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. याप्रकरणी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी या दोन ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. 

माणगाव पोलिसांत गुरुवारी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेशकुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. कावळे यांना अटकही करण्यात आली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी महामार्गावरील अपघातांस जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

चार वर्षांत १७० अपघात आणि ९७ बळीमहामार्गाच्या कामातील हलगर्जीमुळे २०२० पासून आतार्यंत १७० मोटार अपघातांत ९७ जणांना प्राणास मुकावे लागले. तसेच २०८ प्रवाशांना लहान, मोठ्या स्वरुपाच्या गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापती झाल्या आहेत. अपघातग्रस्त वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. 

२०१७ पासून काम सुरूच...- रायगड हद्दीतील इंदापूर ते वडपाले या २६.७ कि. मी. अंतरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाकडून मागविण्यात आलेल्या निविदांद्वारे चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या संयुक्त कंपन्यांना १ जून २०१७ रोजी मंजूर केले. त्यानुसार १८ डिसेंबर २०१७ पासून काम सुरू केले. - या मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे करारात म्हटले होते. मात्र, मुदत संपूनही काम पूर्ण झाले नाही. तरीही शासनाने मुदत वाढून दिली होती. अजूनही हे काम अपूर्णावस्थेतच आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग