शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

पालीतील शेतकऱ्याने फुलवली बहुपीक शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 12:17 AM

Farmer News : कोरोनामुळे मंडप डेकोरेशनचा धंदा ठप्प झाला, मग आता करायचे काय या चिंतेत असलेले पालीतील दीपक शिंदे यांनी आपल्या शेतात बहुपीक पद्धतीचा वापर केला.

- विनोद भोईरपाली : कोरोनामुळे मंडप डेकोरेशनचा धंदा ठप्प झाला, मग आता करायचे काय या चिंतेत असलेले पालीतील दीपक शिंदे यांनी आपल्या शेतात बहुपीक पद्धतीचा वापर केला.दीपक शिंदे यांची अंबा नदीकिनारी मोरटाक्याजवळ साडेतीन एकर शेती आहे. दरवर्षी दिवाळीनंतर भात कापणी झाल्यावर शेतात वाल व इतर कडधान्य ते घेत असत. मात्र, यंदा बहुपीक लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी तब्बल २५ फुल-भाजीपाल्याची व कडधान्याची पिके लावली. वांगी, मिरची, टोमॅटो, घेवडा, पालक, माठ, वाल, मटकी, झेंडू, नवलकोल, गवार, मुळा, मेथी, कोथिंबीर, शिराळी, दुधी, कारली, घोसाळी, काकडी, चवळी व मका, मटकी, मूग, हे सर्वच शेतात आहे. उन्हाळी भात शेतीही केली आहे. पत्नी दीपिकासह शेतात राबतात, जोडीला एक जोडपे कामाला आहे.  कष्टाच्या जोरावर चांगले उत्पन्न सुरू झाले आहे. शिंदे यांनी मटकी अर्धा एकरात, चवळी अर्धा एकर, हरभरा अर्धा एकरात, भात अर्धा एकरात, तसेच वाल, पावटा व घेवडा अर्धा एकरात आणि एक एकरात भाजीपाला लावला आहेे.९ लाखांचे लक्षरोजचा तयार भाजीपाला काढून स्वतःच किंवा पत्नी भाजी विकण्यास पाली बाजारपेठेत बसतात. लोकांनाही स्वस्त व ताजी भाजी मिळते. रोज भाजीपाला तयार होतच आहे. काही दिवसांत भाज्यांची आवक कमी होईल, कडधान्याची मागणी वाढेल आणि दिवसाला ३ ते ४ हजार रुपये मिळतील. त्यामुळे मे पर्यंत ९ लाखावर हे उत्पन्न जाणार आहे.डेकोरेशनचा धंदा कोरोनामुळे ठप्प झाला होता. मग बहुपीक शेती करण्याचा विचार केला. मुबलक पाणी, चांगली मशागत यामुळे चांगले उत्पन्न मिळू लागले.. आता ठरविले आहे की, शेतीच करावी. मंडपाचा धंदा बंद करावा. इतरही शेतकऱ्यांनी आपली शेती न विकता शेती करून भरघोस फायदा कमवावा. - दीपक शिंदे, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRaigadरायगड