'त्या' फार्महाऊस मॅनेजरकडे सापडले ५० हून अधिक व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:33 IST2025-10-30T12:32:46+5:302025-10-30T12:33:01+5:30
महिलांचे अश्लील चित्रीकरण; ३० ऑक्टोबरपर्यंत कोठडी

'त्या' फार्महाऊस मॅनेजरकडे सापडले ५० हून अधिक व्हिडीओ
नवीन पनवेल : स्पाय कॅमेऱ्याद्वारे स्नान करताना महिलांचे व्हिडीओ घेणाऱ्या आरोपीच्या मोबाइलमध्ये पोलिसांना तब्बल ५० हून अधिक व्हिडीओ सापडल्याचे समोर आले आहे. तर दुसऱ्या मोबाइलमधील व्हिडीओ त्याने डिलीट केले आहेत. तेदेखील प्राप्त करण्याची प्रोसेस सुरू असल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी दिली.
धानसर येथील रियांश फार्महाऊसच्या बाथरूममध्ये लावलेल्या स्पाय कॅमेऱ्याद्वारे महिलांचे व्हिडीओ काढणारा आरोपी मनोज चौधरी (रा. रांजणगाव, खारघर) याला तळोजा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले. आरोपीला पनवेल येथील न्यायालयात हजर केले असता ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास तळोजा पोलिस करीत आहेत.