पनवेल मधील शेडुंग टोलवर मनसेचे आंदोलन; विनाटोल वाहने सोडली 

By वैभव गायकर | Updated: October 9, 2023 14:30 IST2023-10-09T14:29:34+5:302023-10-09T14:30:02+5:30

तालुका पोलीस स्टेशन पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

MNS agitation on Shedung toll in Panvel; Vehicles left without tolls | पनवेल मधील शेडुंग टोलवर मनसेचे आंदोलन; विनाटोल वाहने सोडली 

पनवेल मधील शेडुंग टोलवर मनसेचे आंदोलन; विनाटोल वाहने सोडली 

पनवेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टोल बाबतच्या विधानामुळे मनसे आक्रमक झाली आहे.राज्यभरात मनसेचे आंदोलन सुरु झाले असताना पनवेल मधील शेडुंग टोल नाक्यावर देखील दि.9 रोजी मनसेने आंदोलन केले.यावेळी मनसेने अनेक गाड्या टोलवरून टोल न घेता सोडण्यास टोल प्रशासनाला भाग पाडले.

मुंबई पुणे जुना महामार्ग वरील शेडुंग टोल नाक्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी धडक देताच तालुका पोलीस स्टेशन पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.यावेळी जिल्हा चिटणीस केसरीनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.टोलचा झोल बंद करा अशास्वरुपाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Web Title: MNS agitation on Shedung toll in Panvel; Vehicles left without tolls

टॅग्स :MNSमनसे