आमदार राजन साळवींची एसीबीकडून चौकशी, मालमत्तेची कागदपत्रे सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 12:57 IST2023-01-21T12:56:49+5:302023-01-21T12:57:31+5:30
चौकशीला पूर्ण सहकार्य

आमदार राजन साळवींची एसीबीकडून चौकशी, मालमत्तेची कागदपत्रे सादर
अलिबाग (रायगड) : राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी शुक्रवारी अलिबाग लाचलुचपत कार्यालयात हजर राहून त्यांच्या आणि कुटुंबाच्या मालमत्तेची कागदपत्रे सादर केली.
मालमत्तेच्या चौकशीबाबत रायगड लाचलुचपत विभागाने नोटीस पाठवली होती. त्यानुसार १४ डिसेंबर रोजी आमदार साळवी कार्यालयात हजर झाले होते. यावेळी त्यांना त्यांच्या आणि कुटुंबाच्या मालमत्तेची कागदपत्रे सादर करण्यास विभागाने सांगितले होते. त्यानुसार त्यांनी कागदपत्रे सादर केली.
माझ्या संपत्तीबाबत जी माहिती आहे, ती मी अधिकाऱ्यांना दिली आहे. अजूनही त्यांना इतर माहिती हवी आहे ती १० फेब्रुवारीला दिली जाणार आहे. चौकशीला मी पूर्ण सहकार्य करत आहे, असे साळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.