शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीत विवाहितेचा खून

By admin | Updated: September 2, 2015 03:47 IST

अनेकदा पैशाची मागणी करूनही माहेरहून पैसे आणण्यास नकार देणाऱ्या विवाहितेला गळा आवळून ठार मारल्यानंतर रॉकेल टाकून पेटवून देत आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पती व सासूच्या

खालापूर : अनेकदा पैशाची मागणी करूनही माहेरहून पैसे आणण्यास नकार देणाऱ्या विवाहितेला गळा आवळून ठार मारल्यानंतर रॉकेल टाकून पेटवून देत आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पती व सासूच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नराधम पतीला खोपोली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील सासू फरार आहे.खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंतनगर येथे राहत असलेल्या वंदना वाघमारे हिचा विवाह मनोज रामजी वाघमारे यांच्याबरोबर झाला होता. वंदना व मनोजला दोन मुले असून गेली काही दिवस मनोज व त्याची आई पैशासाठी वंदनाचा मानसिक छळ करत होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वंदना होणारा सर्व त्रास निमूटपणे सहन करत होती. ३० आॅगस्टला सकाळी या वरूनच वंदनाचा पती व सासू बरोबर जोरदार वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या मनोज व त्याच्या आईने वंदनाचा गळा आवळून खून केला. हे प्रकरण आपल्या अंगाशी येवू नये म्हणून दोघांनी मिळून वंदनाचा स्टोव्हच्या भडक्याने जळून मृत्यू झाल्याचा बनाव तयार केला.वंदनाचा पैशासाठी छळ होत असल्याचे वंदनाची आई सुरेखा दीपक कदम यांना माहीत असल्याने त्यांनी या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक तपास करून वंदनाचा गळा आवळून खून केल्या प्रकरणी पती मनोज वाघमारे व सासू विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वंदनाचा पती मनोज याला अटक केली आहे. (वार्ताहर)